नवाथे नगरात नकली तृतीय पंथियाना बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 00:07 IST2019-09-29T00:07:38+5:302019-09-29T00:07:57+5:30
नवाथे नगर येथील दसरा मैदानाच्या मागील रोडवर तृतीय पंथियानी दोन नकली तृतीय पंथियाना बेदम मारहाण करण्यात आली.

नवाथे नगरात नकली तृतीय पंथियाना बेदम मारहाण
अमरावती : नवाथे नगर येथील दसरा मैदानाच्या मागील रोडवर तृतीय पंथियानी दोन नकली तृतीय पंथियाना नग्न करून बेदम मारहाण करण्यात आली.
दसरा मैदानामागील झोपडपट्टीतील राहणारे नकली तृतीयपंथीय रेल्वे स्थानक व नवाथे नगरात नागरिकाच्या घरात घुसून पैसे मागत होते. दरम्यान आँटोतून आलेल्या सात तृतीय पंथियानी दोन नकली तृतीय पंथियाना बेदम मारहाण करून त्याचे कपडे फाडून त्यांना नग्न केले. हा सर्व प्रकार मोबाईल फोनमध्ये कैद केला. शनिवारी रात्री 8:30 वाजता हा प्रकार घडला. राजापेठ पोलिसांनी या घटनेच्या माहिती वरून पूढील कारवाई केली. जखमीना ईर्वीन रूग्णालयात पाठवीण्यात आले.