कर्नाटकातील उडुपी येथील टोल प्लाझा येथे रुग्णवाहिकेचा थरारक अपघात, ३ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 19:44 IST2022-07-20T19:44:05+5:302022-07-20T19:44:51+5:30
Accident Case :या दुर्घटनेत एक महिला आणि दोन पुरुष अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

कर्नाटकातील उडुपी येथील टोल प्लाझा येथे रुग्णवाहिकेचा थरारक अपघात, ३ जणांचा मृत्यू
कर्नाटकात उडुपी येथे टोल प्लाझा येथे भरधाव रुग्णवाहिकेचा धक्कादायक अपघात झाला. शिरूर टोल गेटवर बुधवार 20 जुलै रोजी एका वेगवान रुग्णवाहिकेने खांबाला धडक दिल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कर्नाटकमधील हा थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही दुर्दैवी घटना घडली तेव्हाचे भयानक दृश्य दाखविणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वेगाने धावणाऱ्या रुग्णवाहिकेच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. टोल बूथच्या प्रवेशाद्वारावर रुग्णवाहिका उलटताना आणि खांबाला जोरदार आदळताना दिसत आहे.
होन्नावर येथून रुग्णाला कुंदापूर रुग्णालयात आणण्यासाठी निघालेली रुग्णवाहिका चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती खांबाला धडकली. या दुर्घटनेत एक महिला आणि दोन पुरुष अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे.