भयंकर! घर सोडून आई बॉयफ्रेंडसोबत गेली पळून; रडून रडून ११ महिन्यांच्या लेकाने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:05 IST2025-07-09T13:04:29+5:302025-07-09T13:05:16+5:30
पत्नी घर आणि कुटुंब सोडून एका भाडेकरूसोबत पळून गेली आहे. ११ महिन्यांच्या मुलाला सोडून ती बॉयफ्रेंडसोबत पसार झाली.

भयंकर! घर सोडून आई बॉयफ्रेंडसोबत गेली पळून; रडून रडून ११ महिन्यांच्या लेकाने गमावला जीव
उत्तर प्रदेशातील अलिगडमधील क्वार्सी पोलीस स्टेशन परिसरातील हेमंत नगर येथे राहणारा शिवकुमार आपल्या कुटुंबासह एसएसपीसमोर याचिका करण्यासाठी आला होता. त्याने सांगितलं की, त्याची पत्नी घर आणि कुटुंब सोडून एका भाडेकरूसोबत पळून गेली आहे. ११ महिन्यांच्या मुलाला सोडून ती बॉयफ्रेंडसोबत पसार झाली.
आईच्या जाण्याचं दुःख झाल्यामुळे रडून रडून माझ्या मुलाचा १२ दिवसांनी मृत्यू झाल्याचा आरोप पतीने केला. पतीने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आम्ही स्वतः घरात आणि परिसरात तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तिचा कोणताही पत्ता लागला नाही. त्यानंतर आता आम्ही एसएसपी कार्यालयात येऊन पत्नीचा शोध घेण्याची विनंती केली आहे.
अलिगडमधील लोढा पोलीस स्टेशन परिसरातील राहुल नावाचा तरुण त्याची पत्नी आणि मुलांसह भाड्याने राहत होता. याच दरम्यान महिलेची राहुलशी जवळीक वाढली. २७ जून रोजी महिलेने तिच्या लहान मुलाला घरात एकटं सोडून भाडेकरू राहुलसोबत पळून गेली. आई गेल्यानंतर मुलगा आजारी पडला, तो सतत रडायचा आणि १२ दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
विवाहित महिलेसोबत पळून गेलेल्या भाडेकरू राहुलच्या पत्नीनेही एसएसपी कार्यालयात पोहोचून सांगितलं की, तिच्या पतीचे इतर महिलांशी संबंध आहेत. आता तो या महिलेसोबत पळून गेला आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना या प्रकरणात त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचे आणि दोघांनाही शोधण्याचे निर्देश दिले आहेत.