Video - संतापजनक! रोटीवर थुंकून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ; हॉटेलमधील किळसवाणा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 14:13 IST2026-02-22T14:12:05+5:302026-02-22T14:13:41+5:30

रोटी बनवताना त्यावर थुंकत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

aligarh man seeing spitting on chapati video goes viral on internet later arrested hotel | Video - संतापजनक! रोटीवर थुंकून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ; हॉटेलमधील किळसवाणा प्रकार

Video - संतापजनक! रोटीवर थुंकून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ; हॉटेलमधील किळसवाणा प्रकार

उत्तर प्रदेशच्या अलिगडमध्ये रोटी बनवताना त्यावर थुंकत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना रोरावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलीपाडा येथील 'शादाब चिकन दरबार' हॉटेलमधील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ समोर येताच पोलीस आणि अन्न विभागाने तातडीने कारवाई केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये हॉटेलचा एक कारागीर रोटी बनवताना त्यावर थुंकताना स्पष्टपणे दिसत आहे. साधारण ६-६ सेकंदांच्या दोन व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

२१ फेब्रुवारी रोजी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा व्हिडीओ पोलिसांच्या निदर्शनास आला. माहिती मिळताच रोरावर पोलीस ठाण्याच्या पथकाने हॉटेलची ओळख पटवून घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी कारागिराला अटक केली. पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

घटनेचं गांभीर्य ओळखून अन्न विभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचलं. पथकाने हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे नमुने (सॅम्पल) घेतले असून तपास पूर्ण होईपर्यंत हॉटेल  बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

अलिगडचे पोलीस क्षेत्राधिकारी कमलेश कुमार यांनी सांगितलं की, "२१ फेब्रुवारी २०२६ रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ प्राप्त झाला. यात एक व्यक्ती आपल्या ढाब्यावर काम करताना रोटी बनवताना थुंकताना दिसत आहे. या व्हिडिओची तात्काळ दखल घेऊन ढाब्याची ओळख पटवण्यात आली. गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

Web Title : चौंकाने वाला! होटल कर्मचारी ने रोटी पर थूका, ग्राहकों का स्वास्थ्य खतरे में।

Web Summary : अलीगढ़ में एक होटल कर्मचारी द्वारा रोटी पर थूकने का वीडियो सामने आया है। पुलिस ने शादाब चिकन दरबार से कर्मचारी को गिरफ्तार किया। खाद्य सुरक्षा अधिकारियों ने नमूने जब्त किए और जांच तक रेस्तरां बंद कर दिया। घटना से आक्रोश है।

Web Title : Outrageous! Hotel worker spits on roti, endangering customer health.

Web Summary : A video from Aligarh shows a hotel worker spitting on rotis. Police arrested the worker at Shadab Chicken Darbar, and food safety officials seized samples and closed the restaurant pending investigation. The incident sparked outrage.