मद्यपी पित्याने दीड वर्षीय मुलीचा पाण्याच्या हौदात टाकून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 20:40 IST2021-06-28T20:38:39+5:302021-06-28T20:40:08+5:30

Murder Case : याप्रकरणी भादा पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल असून आरोपी वडिलांस अटक करण्यात आली आहे.

Alcoholic father killed 1.5-year-old girl by throwing her in water | मद्यपी पित्याने दीड वर्षीय मुलीचा पाण्याच्या हौदात टाकून केला खून

मद्यपी पित्याने दीड वर्षीय मुलीचा पाण्याच्या हौदात टाकून केला खून

ठळक मुद्देसृष्टी संतोष भाेंडे असे मयत दीड वर्षीय मुलीचे नाव आहे.

बेलकुंड (जि. लातूर) : औसा तालुक्यातील आशिव येथील एका मद्यपी पित्याने दीड वर्षीय मुलीला पाण्याच्या हौदात टाकून खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी भादा पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल असून आरोपी वडिलांस अटक करण्यात आली आहे.

सृष्टी संतोष भाेंडे असे मयत दीड वर्षीय मुलीचे नाव आहे. याप्रकरणी भाद्याचे सपाेनि नाना लिंगे यांनी सांगितले, औसा तालुक्यातील आशिव येथील आरोपी संतोष गंगादास भोंडे याला दारुचे व्यसन होते. तो व्यसनच्या आहारी गेला होता. दारुसाठी तो सतत वडील गंगादास भोंडे व पत्नीशी भांडण करीत असे. त्याचबराेबर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यामुळे घरात सतत भांडण होत असत. शुक्रवारी झालेल्या भांडणात आरोपी संतोष भाेंडे याने दीड वर्षांच्या मुलीला घरातील पाण्याने भरलेल्या हौदात टाकून दिले. त्यात मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीचे वडील गंगादास भोंडे यांच्या तक्रारीवरुन भादा पोलिसांत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस भादा पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास भादा पोलीस ठाण्याचे सपोनि नाना लिंगे हे करीत आहेत.

Web Title: Alcoholic father killed 1.5-year-old girl by throwing her in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.