शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 15:11 IST

वाकड ते नाशिक फाटा या मार्गावरून एक टेम्पो गोवा बनावटीचे विदेशी मद्य घेऊन जाणार असल्याची माहिती पिंपरी विभागाला मिळाली.

पिंपरी :  राज्य उत्पादन शुल्कच्या ई विभागाने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रात गोवा बनावटीची दारू विकण्यासाठी आलेल्या टेम्पोमधून तब्बल ११ लाख ९४ हजार ६०० रुपयांचे दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज, मंगळवारी (दि. १२) कोकणे चौक, रहाटणी येथे करण्यात आली. नागेश मारुती सावंत (वय २९, रा. भूमकर चौक, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाकड ते नाशिक फाटा या मार्गावरून एक टेम्पो गोवा बनावटीचे विदेशी मद्य घेऊन जाणार असल्याची माहिती पिंपरी विभागाला मिळाली. त्यानुसार, रहाटणी येथील कोकणे चौकात मंगळवारी पहाटे सापळा रचून एका संशयित टेम्पोला थांबवून चौकशी केली असता टेम्पोमध्ये विदेशी मद्याचे ११ लाख ९४ हजार ६०० रुपये किमतीचे १३९ बॉक्स आढळून आले.   गोवा राज्यातून स्वस्त दरात खरेदी करून महाराष्ट्रात जास्त किमतीला विकून पैसे कमावण्यासाठी ही दारू आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या मद्यामुळे शासनाचा महसूल चुकवला जातो. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही दारू आणल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Puneपुणेliquor banदारूबंदी