अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:07 IST2025-08-11T19:05:53+5:302025-08-11T19:07:23+5:30
Crime News: सुरक्षा दलात असलेल्या जवानाने तीन वर्षाच्या पोटच्या पोरीचीच हत्या केली. हत्येचे कारण सांगताना आरोपीच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत.

अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
Marathi Crime News: सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या एका जवानाने पोटच्याच तीन वर्षाच्या लेकीचा जीव घेतला. विषारी बिस्कीट खायला देऊन चिमकुलीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी जवानाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रथिंद्र देबवर्मा असे आरोपी जवानाचे नाव आहे. तो १० त्रिपुरा स्टेट रायफल्स दलात कार्यरत आहे. त्रिपुरातील खोवाई जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
पत्नीचे पतीवर गंभीर आरोप
आरोपीची पत्नी मिताली देबवर्मा म्हणाली, आम्ही माझ्या बहिणीच्या घरी बेहलाबारीला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर माझा पती माझ्या बहिणीच्या मुलाला आणि आमच्या मुलीला बिस्किट आणायला घेऊन गेला. त्यानंतर ते बराच वेळ तिथे होते, तेव्हा माझ्या बहिणीने बघितले की, माझ्या मुलीला उलट्या होत आहेत. तिच्या तोंडातून विषारी द्रवासारखा वास येत होता.
मी तिथे गेले आणि माझ्या पतीचा गळा पकडला आणि विचारलं की, तू मुलीला काय खायला दिलं आहेस. तो म्हणाला की असं काहीही खायला दिलं नाही. माझी मुलगी जीबी रुग्णालयात मेली. मी त्याचे केस धरले, तेव्हा त्याने मला मारहाण केली. मला अजून दोन मुली आहेत आणि ही सगळ्यात छोटी होती.
त्याला मुलगा हवा होता, पण तिसरीही मुलगीच जन्माला आली. त्यामुळे विष देऊन तिची हत्या केली, असा आरोप आरोपीच्या पत्नीने केला आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी रथिंद्र देबवर्मा याला अटक केली.