अक्षय कुमारच्या चाहत्याला बंगल्यात घुसणं भोवलं; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 21:31 IST2019-02-06T21:30:29+5:302019-02-06T21:31:57+5:30

अंकितने पोलिसांशी देखील हुज्जत घालायला सुरुवात केली. यानंतर जुहू पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायलयात हजर केले. यानंतर त्याला न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. 

Akshay Kumar's fiancé enters the bungalow; Police arrested | अक्षय कुमारच्या चाहत्याला बंगल्यात घुसणं भोवलं; पोलिसांनी केली अटक

अक्षय कुमारच्या चाहत्याला बंगल्यात घुसणं भोवलं; पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्देजुहू पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायलयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. अंकित गोस्वामी असं या चाहत्याचं नाव आहे. अंकित गोस्वामी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा जबरा चाहता असून त्याचा भुवनेश्वर येथे दुधाचा धंदा आहे. त्याला अक्षय कुमारला भेटण्याची तीव्र इच्छा होती.अंकित आणि सुरक्षा रक्षक यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्याला बंगल्यात घुसणं एका चाहत्याला चांगलेच भोवले आहे. अक्षय कुमारचा जबरा फॅन चक्क त्याला भेटण्यासाठी बंगल्यात घुसला आणि त्याला पोलिसांनी अटक केली आहे. जुहू पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायलयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. अंकित गोस्वामी असं या चाहत्याचं नाव आहे. 

अंकित गोस्वामी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा जबरा चाहता असून त्याचा भुवनेश्वर येथे दुधाचा धंदा आहे. त्याला अक्षय कुमारला भेटण्याची तीव्र इच्छा होती. त्याला ती चांगली अंगाशी आली. अक्षय कुमारला भेटण्यासाठी अंकित भुवनेश्वर येथून मुंबईत आला होता. अक्षय कुमारच्या जुहू येथील बंगल्याचा पत्ता त्याने गुगल मॅपवरून मिळवला आणि त्या पत्त्यावर पोहोचला. अक्षय कुमारला भेटण्यासाठी अंकित कोणत्याही परवानगीशिवाय बंगल्यात शिरला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी अंकितला अडवले. यानंतर अंकित आणि सुरक्षा रक्षक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोघांत वाद निर्माण झाले.  हे पाहून यामध्ये मुंबई पोलिसांनी मध्यस्थी करावी लागली. मात्र, अंकितने पोलिसांशी देखील हुज्जत घालायला सुरुवात केली. यानंतर जुहू पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायलयात हजर केले. यानंतर त्याला न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. 

Web Title: Akshay Kumar's fiancé enters the bungalow; Police arrested