शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

अजनी विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरण :  पोलीस ठाण्यावर पालकांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 23:48 IST

नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत शाळेतील शिक्षकाने केलेल्या गैरप्रकारामुळे पालकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे अफवांचा बाजार गरम होतो आहे. आज दुपारी असाच प्रकार पुन्हा घडल्यामुळे संतप्त पालकांनी अजनी ठाण्यावर धडक दिली.

ठळक मुद्देअफवांचा बाजार गरम : आरोपी शिक्षकाचा पीसीआर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत शाळेतील शिक्षकाने केलेल्या गैरप्रकारामुळे पालकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे अफवांचा बाजार गरम होतो आहे. आज दुपारी असाच प्रकार पुन्हा घडल्यामुळे संतप्त पालकांनी अजनी ठाण्यावर धडक दिली. दरम्यान, आज अजनी पोलिसांनी आरोपी शिक्षकाची न्यायालयातून दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून घेतली आहे.अजनीतील एका खासगी शाळेत चौथ्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत संगीत शिक्षक जोना टिमोथी याने गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. यामुळे तिची प्रकृती बिघडली असून, तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकाराचा बोभाटा होताच पालकांच्या भावनांचा बांध फुटला. पीडित मुलीच्या नातेवाईकांसोबतच अन्य पालकांनी १८ नोव्हेंबरला शाळा प्रशासनाला या संतापजनक प्रकाराबाबत जाब विचारला. दोषी शिक्षकाची चौकशी करून शाळा प्रशासनाने आधीच टिमोथी याच्यावर प्रशासकीय कारवाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. त्यानंतर पालकांनी अजनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हापासून वेगवेगळ्या अफवा पसरत आहे. पोलिसांनी आरोपीला सुविधा दिल्याचाही आरोप होता. प्रत्यक्षात पोलिसांनी तक्रार मिळताच आरोपीला अटक केली आणि त्याचा पीसीआरही मिळवला. आज त्याच्या पीसीआरची मुदत संपल्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. गुन्ह्यातील अनेक बाबी तपासायच्या असल्यामुळे आणखी दोन दिवस पीसीआर हवा, असा पोलिसांनी युक्तिवाद केला. तो मान्य करीत आरोपी टिमोथीला दोन दिवसांचा वाढीव पीसीआर मंजूर करण्यात आला. याच दरम्यान पुन्हा अफवांचा बाजार गरम झाल्याने मोठ्या संख्येत पालक अजनी ठाण्यावर धडकले होते. या प्रकरणात आरोपीला कडक शिक्षा होईल, असे ठोस आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर पालक शांत झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारStudentविद्यार्थीTeacherशिक्षक