अरे बापरे! बॉयफ्रेंडसह मिळून मुलीने आपल्याच घरात डल्ला मारला, कपाटातला लॉकर चोरला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:09 IST2025-01-31T15:08:51+5:302025-01-31T15:09:36+5:30
एका १६ वर्षीय मुलीने तिच्या बॉयफ्रेंडसह मिळून तिच्याच घरातून लॉकर चोरला. ही चोरी घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

फोटो - zeenews
अहमदाबादमधील शेला भागात एका १६ वर्षीय मुलीने तिच्या बॉयफ्रेंडसह मिळून तिच्याच घरातून लॉकर चोरला. ही चोरी घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलगी आणि तिच्या बॉयफ्रेंडविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना २९ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदाबादमधील शेला येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली. कपाटात लॉकर ठेवला होता. लॉकरमध्ये काडतुसं, लायसन्स, पासपोर्ट, सोन्याचे दागिने आणि १.५६ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू होत्या.
वडील त्यांच्या स्कूटरचे कागदपत्रं शोधत असताना त्यांना लॉकर गायब असल्याचं समजलं. घरात त्यांनी शोधाशोध केली. पण काहीच सापडलं नाही. त्यानंतर वडिलांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. फुटेज पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला कारण त्यात त्यांची मुलगी आणि एक तरुण लॉकर घेऊन जात असल्याचं दिसत होते.
जेव्हा वडिलांनी आपल्या मुलीला विचारलं तेव्हा तिने कोणतंही स्पष्ट उत्तर दिलं नाही. नंतर कळलं की, व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण ऋतुराज सिंह चावला आहे, जो कांकरियाच्या बोर्डी मिल परिसरातील रहिवासी आहे. मुलीने चोरी केली नसल्याचं म्हटलं आणि तिने दुसरा बॉक्स उचलला, ज्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू होत्या असं सांगितलं.
लॉकरमध्ये काडतुसं आणि महत्त्वाची कागदपत्रं असल्याने वडिलांनी बापल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ऋतुराज सिंहला अटक करून चौकशी सुरू केली.
चौकशीदरम्यान असं उघड झालं की, मुलगी आणि ऋतुराज दोन वर्षांपूर्वी नवरात्रीच्या दरम्यान एकमेकांना भेटले होते आणि नंतर ते एकमेकांच्या खूप जवळ आले. ऋतुराज आर्थिक संकटात होता म्हणून त्याने मुलीला लॉकर चोरण्यास तयार केलं. चोरी केल्यानंतर दोघांनी लॉकरमध्ये सापडलेल्या काही वस्तू वासना रिव्हरफ्रंटजवळील झुडुपात फेकून दिल्या.