भांडण विकोपाला गेल्याने पत्नीचा गळा आवळून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 20:14 IST2022-03-03T20:13:02+5:302022-03-03T20:14:01+5:30
Murder Case : सप्तश्रृंगी नगरातील संजय जगन्नाथ महाजन (४८) यांचे घरातच किराणा दुकान आहे.
_201707279.jpg)
भांडण विकोपाला गेल्याने पत्नीचा गळा आवळून खून
रावेर, जि. जळगाव : घरगुती भांडण विकापोला गेल्याने पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. ही खळबळजनक घटना रावेर येथील सप्तश्रृंगी माता नगरात गुरुवारी दुपारी एक वाजता घडली.
सप्तश्रृंगी नगरातील संजय जगन्नाथ महाजन (४८) यांचे घरातच किराणा दुकान आहे. गुरुवारी दुपारी त्यांची दोन्ही मुले कामावर गेली होती. पत्नी संगीता (४६) हिच्याशी संजयचा वाद झाला. भांडण विकोपाला गेल्याने संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळला आणि डोक्यात लाकडी पाट मारुन तिचा खून केला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. आरोपी संजय यास बाजार समितीच्या आवारातून ताब्यात घेण्यात आले आहे.