प्रेयसीच्या हत्येनंतर केला मृतदेहावर बलात्कार; तिघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 08:37 IST2023-09-30T08:36:24+5:302023-09-30T08:37:23+5:30
आसाममध्ये तीन नराधम अटकेत

प्रेयसीच्या हत्येनंतर केला मृतदेहावर बलात्कार; तिघे अटकेत
करीमगंज : अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून प्रियकर व त्याच्या दोन मित्रांनी तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. आसामच्या करीमगंज जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
हत्याकांडाचा सूत्रधार रेल्वेचा नवनियुक्त चतुर्थश्रेणी कर्मचारी आहे. त्याचे या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तो शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. मुलगी नकार देत होती. ९ सप्टेंबर रोजी मुलगी घरी एकटी असल्याचे समजल्यानंतर आरोपी दोन मित्रांसह घरी गेला. तिघांनी बळजबरीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यानंतर त्यांनी तिचा गळा दाबून खून केला व नंतर मृतदेहावर बलात्कार केला. त्याच दिवशी करीमगंज बायपासजवळ तिचा मृतदेह सापडला. मुलीच्या वहीत नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावरून पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला. बिप्लब पॉल, शुभ्रा मालाकर व राहुल दास अशी आरोपींचे नावे आहेत. दास हा सूत्रधार आहे. त्याने चौकशीत मुलीसोबतचे प्रेमसंबंध उघड केले. आपण तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे हे कृत्य केले, अशी कबुली दिली. शुभ्रा मालाकरकडून दोन सिमकार्ड घेतले होते. त्यातील एक तो व पीडित मुलगी वापरत होते. (वृत्तसंस्था)