मुलीच्या मृत्यूनंतर जावयाला चप्पलने हाणलं, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 14:10 IST2022-05-10T14:09:07+5:302022-05-10T14:10:47+5:30
Death Case : सोमवारी नंदई रेल्वे लाईनजवळ शर्मिला रुईदास नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता.

मुलीच्या मृत्यूनंतर जावयाला चप्पलने हाणलं, व्हिडिओ व्हायरल
पश्चिम बंगालमधील पूर्व बर्दवान येथील रुग्णालयाच्या शवागारात संतप्त कुटुंबीयांनी गोंधळ घातला. मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी जावयाला बेदम मारहाण केली. हे प्रकरण कळना परिसरातील आहे.
सोमवारी नंदई रेल्वे लाईनजवळ शर्मिला रुईदास नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. रागाच्या भरात मृताचे नातेवाईकही हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप करू लागले. शर्मिलाचे सासरचे लोक तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सासरच्या मंडळींना शवागारात मारहाण
मृताच्या कुटुंबीयांना एवढा राग अनावर झाला की, त्यांनी मृताच्या पतीला शवागाराबाहेर गाडीत नेऊन बेदम मारहाण केली. तसेच मृत महिलेच्या सासरच्या मंडळींनाही चप्पलने मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.
'दारू पिऊन नवरा मारहाण करायचा'
मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, मृताचा पती बनेश्वर दास हा अनेकदा दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नीला मारहाण करायचा. मारहाणीनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. यावेळी उपस्थित पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या महिलेच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे.