मसूद अझहरनंतर हादरला दाऊद इब्राहिम, भीतीने कुटुंबाला पाठवले पाकिस्तानबाहेर 

By पूनम अपराज | Published: January 19, 2021 07:40 PM2021-01-19T19:40:40+5:302021-01-19T19:43:54+5:30

Dawood Ibrahim : पाकिस्तानमध्ये वाढत्या सक्तीनंतर दाऊदने आपल्या कुटुंबातील खास सदस्यांना पाकिस्तानच्या बाहेर हलवले आहे.

After Masood Azhar, Dawood Ibrahim get afraid, the family sent out of Pakistan | मसूद अझहरनंतर हादरला दाऊद इब्राहिम, भीतीने कुटुंबाला पाठवले पाकिस्तानबाहेर 

मसूद अझहरनंतर हादरला दाऊद इब्राहिम, भीतीने कुटुंबाला पाठवले पाकिस्तानबाहेर 

Next
ठळक मुद्देसूत्रांच्या माहितीनुसार खबरदारीचा उपाय म्हणून दाऊदचा मुलगा आणि दोन धाकट्या भावाच्या मुलांना पाकिस्तानच्या बाहेर हलवले आहे.

पाकिस्तानवरील वित्तीय टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या वाढत्या दबावामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दहशतवादी नेटवर्क आणि टेरर फंडिंगविरोधात कारवाई करण्यास भाग पाडले गेले आहे. पाकिस्तान सरकारचे जैश चीफ मसूद अझहर आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकी-उर-रहमान लखवी यांच्याविरोधात कडक कारवाई केल्यानंतर दाऊद इब्राहिम देखील घाबरला आहे. पाकिस्तानमध्ये वाढत्या सक्तीनंतर दाऊदने आपल्या कुटुंबातील खास सदस्यांना पाकिस्तानच्या बाहेर हलवले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार खबरदारीचा उपाय म्हणून दाऊदचा मुलगा आणि दोन धाकट्या भावाच्या मुलांना पाकिस्तानच्या बाहेर हलवले आहे. वृत्तसंस्था आयएएनएसच्या वृत्तानुसार, दाऊदचा धाकटा भाऊ मुस्तकीम अली कासकर यापूर्वीच दुबईमध्ये स्थायिक झाला आहे. तो संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि कतारमधील डी कंपनीचे काम पाहतो. मुस्ताकिम याचा संयुक्त अरब अमिरातीमध्ये कपड्यांचा कारखाना आहे. अलीकडेच कराचीहून दुबई येथे हलविण्यात आलेल्या दाऊदच्या कुटुंबातील जवळचे नातेवाईक यांची देखरेख केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम, कराचीमधील डिफेन्स हाऊसिंग एरियामध्ये राहतो, गेल्या दोन आठवड्यांपासून त्याची माहिती नाही. दाऊदच्या वसुलीचे काम सांभाळणारा दाऊदचा खास छोटा शकीलही कुठेतरी लपून बसला आहे. यापूर्वी दाऊदने आपली मोठी मुलगी माहरुखसाठी पोर्तुगीज पासपोर्टची व्यवस्था केली होती. माहरुखने पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांचा मुलगा जुनैदसोबत लग्न केले आहे. दाऊद सध्या कराची येथून आपला व्यवसाय चालवित आहे.

दाऊदच्या भावाच्या मुलांनाही पाठवले होते १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अनीस इब्राहिमने डी-कंपनीचा कारभार पाहण्यासाठी आपल्या मुलांना आधीच मिडिल ईस्टच्या देशात हलवले होते. सध्या तो सिंध प्रांताच्या कोतली औद्योगिक क्षेत्रात मेहरान पेपर मिलचे काम पाहतो. ही गिरणी कराचीपासून १४४ कि.मी. अंतरावर आहे. पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) अंतर्गत ही पेपर मिल बनावट भारतीय चलन छापल्याचा आरोप केला जात आहे. यापूर्वी अमेरिकन एजन्सी डिपार्टमेंट ऑफ ट्रेझरी ऑफिस फॉरेन अ‍ॅसेटस कंट्रोलने पाकिस्तान सरकारला ही पेपर मिल बंद करण्यास सांगितले होते.

दाऊदचा भाऊ नूरुल हक यांचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. मोठा भाऊ साबिर अहमद याला 1981 मध्ये मुंबईत गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. नंतर साबिरचे कुटुंब पाकिस्तानमध्ये गेले आणि दाऊदच्या देखरेखीखाली राहत आहेत. याशिवाय डॉनचा मुलगा मोईन कासकर बर्‍याचदा लंडनला येतो. त्याचे लग्न ब्रिटनमधील सुप्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलीशी झाले आहे. 2019 पर्यंत ते आपल्या पत्नीसमवेत कराची येथील दाऊदच्या क्लिफ्टन बंगल्यात थांबले होते. मोईन कराची, लाहोर आणि युएई मधील डी-कंपनीचा अब्ज डॉलर्सचा रिअल इस्टेट व्यवसाय हाताळतो.

Web Title: After Masood Azhar, Dawood Ibrahim get afraid, the family sent out of Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app