विवाहित महिलेशी लग्न केल्यानंतर, नराधमाचा तिच्या मुलीवर पडली नजर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 16:54 IST2021-07-09T16:53:40+5:302021-07-09T16:54:49+5:30
Kidnapping Case : काही दिवसांनी सावत्र बापाने या महिलेच्या मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील इंदूर येथे घडली आहे. याबाबत पीडित महिलने आरोपी नवऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

विवाहित महिलेशी लग्न केल्यानंतर, नराधमाचा तिच्या मुलीवर पडली नजर अन्...
इंदूर शहरातील स्कीम ७८ मध्ये राहणाऱ्या महिलेने आरोपी संतोषसिंग तोमर राहणारा खजराना याच्याविरूद्ध तिच्या मुलीसोबत जबरदस्तीने लग्न करण्यासाठी अपहरण करून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संतोष तिच्या मुलीचा सावत्र पिता असल्याचे या महिलेने सांगितले. यापूर्वी या महिलेचे कमलेश चौधरी यांच्याशी लग्न झाले होते, तिच्याबरोबर दररोज हा वाद होत होता, त्यानंतर ती आपल्या मुलीसह स्वतंत्र राहण्यास गेली होती. आरोपी विवाहित महिलेच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न केले. काही दिवसांनी सावत्र बापाने या महिलेच्या मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील इंदूर येथे घडली आहे. याबाबत पीडित महिलने आरोपी नवऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरमधील खजराना गावात रहाणाऱ्या संतोष सिंह नावाच्या व्यक्तिने लसूडिया गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेमविवाह केला होता, मात्र लग्नानंतर १५ दिवसांनीच संतोषची नजर या विवाहित महिलेच्या मुलीवर पडली. त्याने तिच्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी जिद्दच केली. नंतर 'माझी मुलगी ही नात्याने आता तुझीसद्धा मुलगीच आहे. तिच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट मनातून काढून टाक, असे सांगून विवाहित महिलेने मुलीपासून संतोषला दूर करण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला हे पटले नाही. शेवटी आरोपी संतोषने सोमवारी रात्री पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्या मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले.
या घटनेनंतर मुलगी हरवल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत केली. पोलिसांनी आरोपी संतोष सिंहवर मुलीला पळवून नेल्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपी संतोष आणि त्याने पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेत आहेत.