शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दंगल गर्ल बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या; कुस्तीत पराभव झाल्याने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 16:11 IST

Babita Phogat Sister Suicide News : कुस्तीच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव ती स्वीकारू शकली नाही. त्यामुळे तिने सोमवारी रात्री गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

नवी दिल्ली - दंगल गर्ल गीता आणि बबीता फोगट (Geeta and Babita Phogat Sister) यांच्या मामे बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुस्तीच्या सामन्यात पराभव झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. कुस्तीच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव ती स्वीकारू शकली नाही. त्यामुळे तिने सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. संबंधित महिला कुस्तीपटू गेल्या अनेक वर्षांपासून आपले महाबीर पैलवानच्या यांच्या घरी कुस्तीचा सराव करत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बबीता फोगाटच्या 17 वर्षीय मामे बहिणीचं नाव रितिका असं आहे.  ती राजस्थानच्या झंझनू जिल्ह्यातील जैतपूर या गावातील रहिवासी आहे. मृत रितिका द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महाबीर पैलवान यांच्या कुस्ती अ‍ॅकॅडमीत गेल्या अनेक वर्षांपासून सराव करत होती. काही दिवसांपूर्वी रितिकाने भरतपूरच्या लोहागड स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभव पत्करावा लागला.

हा पराभव तिच्या जिव्हारी लागला होता. यावेळी स्टेडियममध्ये महाबीर फोगट देखील उपस्थित होते. अंतिम सामन्यात झालेला पराभव रितिकाच्या जिव्हारी लागल्याने तिने 15 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास महाबीर फोगट यांच्या बलाली गावातील राहत्या घरात आत्महत्या केली आहे. तिच्या खोलीतील पंख्याला ओढणी बांधून तिने आपलं आयुष्य संपवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पहिलवान रितिकाने 15 मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरातील एका खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

...अन् कुस्तीच्या सामन्यात एका गुणाने झालेला पराभव लागला जिव्हारी

रितिकाच्या मृतदेहावर दादरी येथील सिव्हील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला आहे. यावेळी डीएसपी राम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचं शवविच्छेदन झालं असून पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं आहे. भरतपूर या ठिकाणी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत रितिकाचा अवघ्या एका गुणाने पराभव झाला होता. याचा तिला चांगलाचं धक्का बसला होता. या धक्क्यातून तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBabita Kumari Phogatबबिता फोगाटPoliceपोलिसWrestlingकुस्तीDeathमृत्यू