देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:35 IST2025-05-30T10:34:41+5:302025-05-30T10:35:07+5:30
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांविरुद्ध तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांविरुद्ध तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि एटीएस (दहशतवादविरोधी पथक) यांनी संयुक्तपणे एक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्रासह अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आता एटीएसने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानला भारताची माहिती देणाऱ्या, देशाशी गद्दारी करणाऱ्या एकाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात
एटीएसने तीन जणांना ताब्यात घेतलं होतं. मात्र चौकशीनंतर त्यापैकी दोघांना सोडण्यात आलं आहे. एटीएस एका आरोपीची सखोल चौकशी करत आहे. ठाण्यातील कळवा येथील एक व्यक्ती फेसबुकद्वारे एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता. एटीएसच्या तपासात असं समोर आलं आहे की, हा व्यक्ती नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ पर्यंत फेसबुकद्वारे पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता आणि त्याने व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानला अनेक ठिकाणची महत्त्वाची माहिती आणि फोटो पाठवले होते.
"पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?
देशभरात शोध सुरू
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात राहून पाकिस्तानला मदत करणाऱ्या गद्दार लोकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. देशभरात संशयितांना अटक केली जात आहे. कळवा येथील एक व्यक्ती पाकिस्तानमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याची एटीएसला माहिती मिळाली होती. त्यानुसार एटीएसने एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. त्याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं.
पाकिस्तानात फिरताना ज्योतीच्या आजुबाजुला AK-47 घेऊन ६ गनर्स, Video ने उलगडलं रहस्य
ज्योतीने मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर; पोलिसांना मिळाले अनेक महत्त्वाचे पुरावे
दोघांना चौकशीनंतर सोडलं
एटीएसने ठाण्यात ही कारवाई केली. आरोपींसह ताब्यात घेतलेल्या दोघांना चौकशीनंतर सोडण्यात आलं. मात्र गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल. अटक करण्यात आलेला व्यक्ती मुंबईतील एका महत्त्वाच्या संस्थेत काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. एटीएस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. यात आणखी लोकांचा सहभाग आहे की नाही याचा तपास केला जात आहे.