शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

विवाहित महिलेशी अनैतिक संबंध, मंदिरात केलं लग्न; मग, अचानक उचललं खळबळजनक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 20:35 IST

बदनामी होण्याच्या भीतीनं नीरजनं त्या विवाहित महिलेशी मंदिरात लग्न केले.

पटना – प्रेमात चंद्रतारे तोडून आणण्याचं स्वप्न दाखवत विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. संबंधांबाबत सत्य उघड होताच त्याच महिलेसोबत मंदिरात जाऊन लग्न केले. परंतु जेव्हा ही महिला प्रेयसी ते पत्नी बनली तिने प्रियकराच्या घरी जाण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला. त्यावेळी नुकताच पती बनलेल्या प्रियकरानं पत्नीसोबत जे काही केले ते ऐकून सर्वच हैराण झाले.

अनैतिक संबंध ते लग्नापर्यंत पोहचलेली ही कहानी आहे पटना जिल्ह्यातील बुढनीचक गावातील. याठिकाणी राहणाऱ्या नीरज नावाच्या युवकाचं शेजारील महिलेच्या घरात येणंजाणं होतं. ती महिला एकटीच राहायची. तिचा पती नाशिकमध्ये होते. नीरज त्या महिलेच्या घरी तासनतास वेळ घालवायचा. त्याचवेळी दोघांमधील जवळीक वाढली. दोघंही एकमेकांवर प्रेम करु लागले. एकमेकांसोबत जगण्या मरण्याची शपथ घेऊ लागले. नीरज त्याच्या विवाहित प्रेयसीच्या प्रेमात वेडा झाला होता.

दोघांमध्ये शारिरीक संबंध बनले, दोघंही नेहमी रात्र एकत्र घालवत होते. दोघांबाबत चर्चा सुरु झाल्या. बदनामी होण्याच्या भीतीनं नीरजनं त्या विवाहित महिलेशी मंदिरात लग्न केले. महिलेच्या बहिणीने सांगितले की, लग्नानंतर दोघंही एकत्र राहत होते. परंतु गेल्या मंगळवारी रात्री नीरजने त्याच्या बहिणीची गळा दाबून हत्या केली. मृतकाच्या बहिणीच्या मते, आरोपी नीरज बहिणीसोबत लिव इनमध्ये दुसऱ्या ठिकाणी राहू इच्छित होता.

नीरज त्याच्या विवाहित प्रेयसीला घरी नेण्यास तयार नव्हता. मात्र ती महिला घरी नेण्यासाठी नीरजवर सातत्याने दबाण आणू लागली. याच गोष्टीने नीरज आणि प्रेयसीत भांडणं सुरु झाली. वाद इतके विकोपाला गेले की नीरजा संताप अनावर झाला. ज्या महिलेवर नीरज जीवापाड प्रेम करायचा त्याच महिलेचा गळा आवळून मारुन टाकलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले.

मृत महिलेचे २० वर्षापूर्वी लग्न झालं होतं. परंतु तिचा पती नाशिकमध्ये राहत होता. जेव्हा त्याला पत्नी आणि नीरजच्या अनैतिक संबंधांबाबत कळालं तेव्हा त्याने पत्नीसोबत नातं तोडलं. त्यानंतर ते दोघंही वेगळे राहू लागले. मात्र नीरज आणि महिलेमधील जवळीक वाढली. या दोघांच्या लफड्याची चर्चा गावभरात झाल्यावर दोघांनी लग्न केले. मात्र अखेर नीरजनं तिलाच संपवले. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहे जो घटनेपासून फरार झाला आहे.