दिल्लीनंतर नोएडातील रस्त्यावरही निर्दयीपणाचा कळस, तरुणीला गाडीनं चिरडलं अन् ओळख पटू नये म्हणून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 13:54 IST2023-01-02T13:45:24+5:302023-01-02T13:54:56+5:30
मृत तरुणीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे. तिची ओळख पटण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. तसेच तिचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

दिल्लीनंतर नोएडातील रस्त्यावरही निर्दयीपणाचा कळस, तरुणीला गाडीनं चिरडलं अन् ओळख पटू नये म्हणून...
दिल्लीत एका तरुणीला कारने 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची घटना घढल्यानंतर, आता ग्रेटर नोएडामधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रेटर नोएडा ईस्टर्न पेरीफेरल हाईवेवर एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, ओळख पटू नये यासाठी या तरुणीचे डोकेही टायरणे चिरडण्यात आले आहे. या मृतदेहाजवळ कुठलेही वाहन आढळून आलेले नाही. या प्रकरणी, हत्या करून मृतदेह फेकून दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादरी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू करण्यात आला आहे.
दादरी पोलिसठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी एका तरुणीचा मृदतेह ईस्टर्न पॅरिफेरल एक्सप्रेस वेवर आढळून आला आहे. तिचे डोके देखील वाहनाने चिरडले गेले आहे. महत्वाचे म्हणजे, या तरुणीची दुसऱ्या कुठल्या ठिकाणी हत्याकरून तिचा मृतदेह येथे फेकण्यात आल्याचा अंदाज आहे.
याप्रकरणी पोलीस विविध कंगोऱ्यांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. मृत तरुणीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे. तिची ओळख पटण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. तसेच तिचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, येथून काही अंतरावर दिल्लीत एका तरुणीची तब्बल 12 किलोमिटरपर्यंत फरफटत नेऊन हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली असतानाच, नोएडातून ही घटनाही समोर आली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास सुल्तानपुरी भागात कारने स्कूटीवरील एका मुलीला धडक दिली. मुरथलवरून पार्टी करून परतणाऱ्या पाच जणांनी कार थांबवली नाही आणि 12 किलोमिटरपर्यंत संबंधित मुलीला फरफटत नेले. यानंतर ते तरुणीचा मृतदेह कंझावलातील जौंती गावात टाकून फरार झाले आहेत.