घसा खवखवल्यानंतर पतीला कॅन्सर झाल्याचं कळलं अन् दाम्पत्याने उचलले हे भयानक पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 20:44 IST2022-05-01T20:43:57+5:302022-05-01T20:44:42+5:30

Suicide Case : मूळचा सोनभद्र जिल्ह्यातील अरुण सिंग (31) हा पत्नी शशी कला (29) यांच्यासोबत सेक्टर-22 मध्ये भाड्याने राहत होता. अरुण हा सेक्टर-62 मधील एका कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता.

After a sore throat, her husband was diagnosed with cancer and the couple took this terrible step | घसा खवखवल्यानंतर पतीला कॅन्सर झाल्याचं कळलं अन् दाम्पत्याने उचलले हे भयानक पाऊल

घसा खवखवल्यानंतर पतीला कॅन्सर झाल्याचं कळलं अन् दाम्पत्याने उचलले हे भयानक पाऊल

नवी दिल्लीतील नोएडामध्ये सेक्टर-22 मध्ये शुक्रवारी रात्री दाम्पत्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.  सेक्टर-24 पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, मूळचा सोनभद्र जिल्ह्यातील अरुण सिंग (31) हा पत्नी शशी कला (29) यांच्यासोबत सेक्टर-22 मध्ये भाड्याने राहत होता. अरुण हा सेक्टर-62 मधील एका कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता.


अरुण हे बऱ्याच दिवसांपासून घसा दुखीच्या समस्येने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्या सर्व चाचण्या करून घेतल्या, त्यात कॅन्सरची लास्ट स्टेज असल्याचं आढळून आलं. तेव्हापासून हे दाम्पत्य तणावात होते. त्यानंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली असून त्यामध्ये दोघांनीही मृत्यूसाठी कोणाला जबाबदार धरलेले नाही. दोघांचेही तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. अरुण गेल्या अनेक वर्षांपासून नोएडाच्या सेक्टर 22 मध्ये राहत होता.

वास्तविक, घसादुखीचा त्रास झाल्यानंतर अरुणच्या मेडिकल टेस्ट झाल्या. अरुणचा वैद्यकीय अहवाल २५ एप्रिलला आला. अरुणला कॅन्सर झाल्याचे अहवालात आढळून आले. हा कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये असल्याने दाम्पत्य तणावाखाली गेले होते. खचलेल्या पती-पत्नीने हे भयानक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

Web Title: After a sore throat, her husband was diagnosed with cancer and the couple took this terrible step