पाळणा हलला नाही! नैराश्येतून पती-पत्नीने केली आत्महत्या, विवस्त्र अवस्थेत सापडले मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:42 IST2022-06-20T17:27:50+5:302022-06-20T17:42:59+5:30
Suicide Case : दोघांचे वय 33 ते 35 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाळणा हलला नाही! नैराश्येतून पती-पत्नीने केली आत्महत्या, विवस्त्र अवस्थेत सापडले मृतदेह
मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोघांचेही मृतदेह त्यांच्याच खोलीत विवस्त्र अवस्थेत आढळून आले. दोघांच्या लग्नाला पंधरा वर्षे झाली होती, मात्र मूल होत नसल्याने ते डिप्रेशनमध्ये होते, असे सांगितले जाते. दोघांचे वय 33 ते 35 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर चौकीतील विशेषपूर माफी येथील रहिवासी बुद्धू सेठ (वय 35 वर्ष) आणि त्यांची पत्नी राणी वय 33 वर्ष हे मंगळवारी रात्री 11 वाजता जेवण करून झोपले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत ते खोलीतून बाहेर न आल्याने घरच्यांनी बाहेरून हाक मारली, आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने घरातील सदस्य काळजीत पडले आणि त्यांनी दरवाजा तोडला. जिथे पती-पत्नी बेडवर मृतावस्थेत आढळून आले आणि दोघांच्याही तोंडाला फेस येत होता.
मूल न झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये होते
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. सीओ चुनार रामानंद राय यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी मृत्यू हा काही विषारी पदार्थ खाल्ल्याने झाल्याचे दिसते. तसेच, सीओने सांगितले की, चौकशीदरम्यान असे समजले की दोघांच्या लग्नाला 15 वर्षे झाली होती, पण मूल होत नव्हते, त्यामुळे दोघेही डिप्रेशनमध्ये राहत होते.