शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 14:49 IST

श्रद्धा वालकरचे तुकडे करणारा आरोपी तिहार तुरुंगात कैद आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत 2022 साली झालेल्या श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. आता या हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला (Aftab poonawala) याच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. तिहार तुरुंगात कैद असलेला आफताब लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीच्या हिटलिस्टवर आला आहे. 

बाबा सिद्दिकींच्या हल्लेखोराचा कुलासामीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील आरोपी शिवकुमार गौतम याने चौकशीत हा खुलासा केला आहे. सिद्दीकींच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या बिष्णोई टोळीचा सदस्य, शुभम लोणकर याने आफताब पूनावालाबाबत आपल्याशी चर्चा केल्याचे शिवकुमार गौतमने पोलिसांसमोर कबूल केले. मात्र, आफताब अत्यंत सुरक्षेत असल्याने टोळीने त्यांची योजना थांबवली.

ही माहिती समोर आल्यानंतर तिहार तुरुंग प्रशासन आफताब पूनावालाच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहे. आफताबला तिहार तुरुंगातील क्रमांक 4 मध्ये ठेवण्यात आले आहे. तिहार तुरुंगाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, मात्र प्रशासनाने मीडियातील वृत्तांची दखल घेत आफताभच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. 

18 मे 2022 रोजी श्रद्धाची हत्या 18 मे 2022 रोजी मुंबईची रहिवासी असलेल्या श्रद्धा विकास वालकरची दिल्लीत हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला आणि श्रद्धा अनेक दिवसांपासून दिल्लीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. श्रद्धाचा मित्र अनेक दिवसांपासून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तिचा काहीच संपर्क होत नव्हता. अखेर त्याने ही बाबत श्रद्धाच्या वडिलांना सांगितले आणि त्यांनी मुंबई पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर मुंबई पोलिसांच्या माहितीवरुन दिल्ली पोलिसांनी आफताबला घरातून अटक केली. चौकशीत त्याने श्रद्धाची हत्या करुन तिचे तुकडे केल्याचु कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNew Delhiनवी दिल्लीjailतुरुंगPoliceपोलिस