Shraddha Murder Case आफताबची नार्को टेस्ट, दिल्ली पोलिसांची प्रश्नांची यादी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 12:38 IST2022-11-20T12:38:23+5:302022-11-20T12:38:34+5:30

आफताबचा गुन्हा कसा सिद्ध करायचा हे दिल्ली पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. सोमवारी आफताबची नार्को टेस्ट होणार असून त्यासाठी दिल्ली पोलिसांनी प्रश्नांची यादी तयार केली आहे. 

afrab-poonawala's-narco-test-delhi-police-ready-with-all-the-questions-to-be-asked | Shraddha Murder Case आफताबची नार्को टेस्ट, दिल्ली पोलिसांची प्रश्नांची यादी तयार

Shraddha Murder Case आफताबची नार्को टेस्ट, दिल्ली पोलिसांची प्रश्नांची यादी तयार

दिल्लीतीलश्रद्धा वालकर हत्याकांडाने देशाला हादरवुन सोडले आहे. मे महिन्यात आफताब पुनावालाने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेल्या श्रद्धाचे ३५ तुकडे करुन निर्घृणरित्या खून केला. सहा महिन्यांपुर्वीच हत्या केल्याने तोवर आफताबने सर्व पुरावे नष्ट केले आहेत. त्यामुळे आता आफताबचा गुन्हा कसा सिद्ध करायचा हे दिल्लीपोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. सोमवारी आफताबची नार्को अॅनालिसिस टेस्ट होणार असून त्यासाठी दिल्ली पोलिसांनी ४० प्रश्नांची यादी तयार केली आहे. 

नार्को टेस्ट ची गरज का ?

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबच्या चौकशीत तो अनेकदा त्याचे विधान सतत बदलत होता. न घाबरता, नर्व्हस न होता तो विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता. सतत विधान बदलत राहिल्याने तो दिशाभुल करत असेल असा संशय आहे. 

नार्कोटेस्ट पुर्वी आफताबसोबत संवाद

फॉरेंन्सिक सायन्स लेबोरेटरीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की नार्को अॅनालिसिससाठी वेळ लागतो. नार्को टेस्टपुर्वी अनेक टेस्ट केल्या जातात. प्री नार्को टेस्ट व्यक्तीच्या मेडिकल स्टॅंडर्ड ची माहिती घेते. यादरम्यान मानसोपचारतज्ञ सामिल असतात. ही टेस्ट तेव्हाच होते जेव्हा व्यक्ती शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ आहे. ही खूपच क्रिटिकल टेस्ट असते. टेस्ट करणारी टीम आधी आफताबसोबत संवाद साधेल. यानंतर त्याच्या मानसिक स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी इतर टेस्ट केल्या जातील.

आफताबला कोणते प्रश्न विचारले जातील?

श्रद्धा वालकर ला ओळखतो का ?

ती तुझी गर्लफ्रेंड होती का ?

मुंबई सोडल्यानंतर तुम्ही कुठे गेलात ?

तुम्ही दोघे अचानक दिल्ली ला का शिफ्ट झाले?

तुम्ही कधी रिलेशनशिपमध्ये आलात ? तुझे श्रद्धावर प्रेम होते का ?

तुमच्यात कधी भांडणे होत होती का ? तु श्रद्धा ला मारले होते का ?

श्रद्धा ला शेवटचे कधी बघितले ?

सध्या श्रद्धा कुठे आहे माहित आहे का ?

तु श्रद्धा ची हत्या केली आहे का ?

श्रद्धा ची हत्या का केली ?

श्रद्धा ला तु कसे मारले ? तिचा गळा दाबला का ?

श्रद्धाच्या अवयवांचे तुकडे केले का ? ते कुठे नेऊन फेकले ?

अवयव फेकण्यासाठी किती चकरा मारल्या ?

तु ड्रग्स घेतले होते का ?

तु चरस घेतो का ?

हत्या केली त्या दिवशी नशा केली होती का ?

हत्या करण्यापुर्वी श्रद्धालाही ड्रग्स दिले होते का ?

तुला श्रद्धाची आठवण येते का ?

तु स्वत:ला दोषी मानतो का ?

हत्या केल्यानंतर फ्लॅट कसा साफ केला ?

श्रद्धाच्या हत्येनंतर किती मुलींसोबत होता ?

Web Title: afrab-poonawala's-narco-test-delhi-police-ready-with-all-the-questions-to-be-asked