अभिनेत्री बलात्कारप्रकरणी घटनास्थळाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 06:27 IST2020-09-26T06:26:59+5:302020-09-26T06:27:10+5:30
वर्सोवा पोलिसांकडून तपास सुरू; निर्माता अनुराग कश्यप यांच्यावर अत्याचाराचा आरोप

अभिनेत्री बलात्कारप्रकरणी घटनास्थळाची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांच्याविरोधात अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर नुकताच लैंगिक अत्याचाराचा गुन्हा वर्सोवा पोलिसांनी दाखल केला. या प्रकरणी तिने गुन्हा घडल्याचा दावा केलेल्या घटनास्थळाला गुरुवारी तपास अधिकाऱ्यांनी भेट दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पीडित अभिनेत्रीने वर्सोवा पोलिसांसह यारी रोड या ठिकाणी भेट दिली. येथेच तिच्यावर कश्यप यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा तिचा आरोप आहे. घटनास्थळाबाबत काहीसा संभ्रम असल्याने जागेचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मात्र, अजूनही कश्यप यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावणे पाठवले नसून, त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
कश्यपसोबत पीडितेची भेट ‘फ्रीडम’ या चित्रपटादरम्यान झाली होती. तिच्यासोबत २०१४-१५ मध्ये हा प्रसंग घडल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींनी याबाबत वाच्यता करू नकोस, असा सल्ला दिला होता.
तिने याबाबत टिष्ट्वटरवर पोस्ट लिहिल्यावर घरच्यांनी तिला ती डिलीट करायला लावली, असे तिचे म्हणणे आहे.