जुगारप्रकरणी अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 15:33 IST2019-07-03T15:31:04+5:302019-07-03T15:33:52+5:30

पोलिसांनी धाड टाकत १८ जणांना अटक करण्यात आली.

Actress Bhagyashree's husband arrested in gambling | जुगारप्रकरणी अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक

जुगारप्रकरणी अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक

ठळक मुद्देअंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला परिसरात पोकरच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एकूण २६ जणांना अद्याप अटक करण्यात आली

मुंबई - मैंने प्यार किया या प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय दसानी याला अंबोली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अंधेरी पश्चिमच्या लोखंडवाला परिसरात पोकरच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत १८ जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील चौकशीत एकूण २६ जणांना अद्याप अटक करण्यात आली असून दसानी याचाही त्यात सहभाग असल्याचे उघड झाल्यावर त्यालाही गजाआड करण्यात आल्याचे अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

Web Title: Actress Bhagyashree's husband arrested in gambling