अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 06:01 IST2025-06-03T06:00:02+5:302025-06-03T06:01:41+5:30

सत्र न्यायालयाने फेटाळला होता अर्ज

Actor Ajaz Khan's anticipatory bail hearing to be held after summer vacation in Mumbai High Court | अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी

अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अभिनेता एजाज खान याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र त्यावरील सुनावणी आता उन्हाळी सुटीनंतर नियमित खंडपीठासमोर होणार आहे.

हे प्रकरण दि. २२ मे रोजी न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्यासमोर सुनावणीसाठी आले होते. त्यावेळी अतिरिक्त सरकारी वकिलांनी या जामीन अर्जावर बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला होता. तेव्हा त्याच्या सुनावणीची तारीख दि. २ जून ठरवण्यात आली.

सोमवारी न्यायमूर्ती अश्विन भोचे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, एजाज खानचे वकील अमित दुबे यांनी या प्रकरणात युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील अशोक सरोगी हे व्यक्तिगत अडचणींमुळे उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यामुळे न्या. भोवे यांनी हे प्रकरण सुनावणीसाठी उन्हाळी सुटीनंतर नियमित खंडपीठासमोर ठेवण्याचे स्पष्ट केले.

सत्र न्यायालयाने फेटाळला होता अर्ज

  • एजाज खान विरोधात चारकोप पोलिस स्थानकात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिला कलाकाराने त्याच्यावर केला आहे.
  • याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दि. १५ मे रोजी खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तक्रारदार महिलेला आपण विवाहित असल्याची माहिती होती, मात्र तरीही ती महिला आपल्याशी लग्न करण्यासाठी आग्रही होती.
  • तिच्या आग्रहाला सातत्याने विरोध केला. मात्र आपल्याविरोधात जाणीवपूर्वक खोटे आरोप केल्याचा दावा खानने केला आहे.

Web Title: Actor Ajaz Khan's anticipatory bail hearing to be held after summer vacation in Mumbai High Court