शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

डॉक्टरकडून खंडणी वसूल केल्या प्रकरणी पोलिसांसह आठ जणांवर मोक्का कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 3:18 PM

हडपसर येथील एका डॉक्टरला गर्भलिंग तपासणी करतो, असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ७ लाख रुपये खंडणी उकळण्यात आली होती.

ठळक मुद्देडॉक्टर खंडणी प्रकरण : सुत्रधार महिलेवर ५ गुन्हे

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी समीर थोरात याच्यावर ८ जणांवर खंडणी प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी समीर थोरात याच्या जामीनावर गुरुवारी न्यायालयात होती. या सुनावणीच्या वेळी पोलिसांनीडॉक्टरांना खंडणी मागून त्यांच्याकडून ७ लाख रुपये उकळणाऱ्या या टोळीतील ८ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याची माहिती न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने समीर थोरात याचा जामीन फेटाळून लावला. हडपसर येथील एका डॉक्टरला गर्भलिंग तपासणी करतो, असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ७ लाख रुपये खंडणी उकळण्यात आली होती. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. त्यात पोलीस कर्मचारी समीर थोरात, स्वयंघोषित पत्रकार प्रदीप फासगे, सामाजिक कार्यकर्ता कैलास ऊर्फ भागूदास अवचिते, आरती चव्हाण यांना अटक केली आहे़. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार रंजना वणवे, सागर राऊत, महेश पवार, किरण माकर (सर्व रा. बारामती) हे फरार आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सांगितले की, रंजना वणवे ही या टोळीची मुख्य सुत्रधार असून तिच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत. ती प्रत्येक वेळी गुन्हा करताना वेगवेगळ्या लोकांचा वापर करते. यापूर्वी तिला बार्शी येथे अशाच प्रकारे डॉक्टरांकडून खंडणी वसुल केल्याप्रकरणात अटक केली होती. तेथे तिच्यावर मोक्का अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. हे सर्व त्या टोळीमध्ये सहभागी असल्याने त्यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी मोक्का कारवाईला १ जुलै रोजी मंजुरी दिली आहे. याबाबत समीर थोरात यांच्यावतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीविरुद्ध यापूर्वी एकही गुन्हा नसल्याने त्यास मोका कायदा लागू होत नाही. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे अ‍ॅड़ ठोंबरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरPoliceपोलिस