शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

पिंपरीत लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या १७३ जणांवर रविवारी पोलिसांकडून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 6:59 PM

लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता देण्यात आली असली तरी काही निर्बंध अद्यापही लागू...

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्वाधिक देहूरोड पोलीस ठाण्यांतर्गत ४० कारवाई

पिंपरी : कोरोना महामारीला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने ते लॉकडाऊन मागे घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यात शिथिलता देण्यात आली असली तरी काही निर्बंध अद्यापही लागू आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७३ जणांवर रविवारी (दि. ७) पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. मात्र जीवनावश्यक तसेच इतर काही आस्थापनांना यातून सवलत देण्यात आली आहे. तर काही बाबतीत अद्यापही निर्बंध आहेत. असे असतानाचही प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे देखील उल्लंघन करण्यात येत आहे. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत रविवारी सर्वाधिक देहूरोड पोलीस ठाण्यांतर्गत ४० कारवाई करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल हिंजवडी ३५, वाकड ३५, सांगवी १७, चिखली १५, चिंचवड १३, पिंपरी ३, दिघी ३, एमआयडीसी भोसरी ३, चाकण २, भोसरी १, आळंदी १, तळेगाव एमआयडीसी १, तर म्हाळुंगे पोलीस चौकींतर्गत ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर निगडी व तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे तसेच रावेत व शिरगाव पोलीस चौकी अंतर्गत एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर