शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 7:12 PM

ओडिशाला पळून जाण्याचा बेत : चोरीतील घड्याळामुळे मिळाली तपासाला दिशा

ठळक मुद्दे पोलिसांनी भावेश यांच्या इमारतीच्या सीसीटीव्ही चित्रणाची पडताळणी केली. एक महिला भावेश यांच्या घरातून चोरी करून जात असल्याचे आढळले.

ठाणे - मालकाच्या घरातील हिरेजडीत दागिन्यांसह सहा लाख ८५ हजारांचा ऐवज चोरी करून ओडिशाला पळून जाण्याच्या बेतात असलेल्या मोलकरणीला वागळे इस्टेट पोलिसांनी २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. मिन्नती दुर्योधन गौडा (३१, रा. ओम अयोध्या चाळ, लोकमान्यनगर, पाडा क्र मांक-३, ठाणे) असे त्या मोलकरणीचे नाव आहे. तिच्याकडून सर्व ऐवज हस्तगत केल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.वागळे इस्टेट येथील रहिवासी भावेश मिर्गनानी (३७) यांच्या घरातून अनोळखी चोरट्यांनी सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह सुमारे सहा लाख ८५ हजारांचा ऐवज चोरी झाल्याची घटना १ ते ३ जूनदरम्यान घडली होती. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ६ जून रोजी मिर्गनानी यांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांचे पथक या घटनेचा तपास करत असतानाच पोलिसांनी भावेश यांच्या इमारतीच्या सीसीटीव्ही चित्रणाची पडताळणी केली. त्यात एक महिला भावेश यांच्या घरातून चोरी करून जात असल्याचे आढळले.ही महिला पूर्वी त्यांच्या घरात कामाला होती, अशीही माहिती समोर आली. तिचा कोणताही पत्ता उपलब्ध नसताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लोकमान्यनगर, पाडा क्रमांक-४ येथील या महिलेचा पोलिसांनी शोध घेतला. त्यावेळी तिच्या घराच्या बाहेर खेळत असलेल्या तिच्या १२ वर्षांच्या मुलाच्या हातात परदेशी बनावटीचे महागडे घड्याळ उपनिरीक्षक पोटे यांच्या पथकाला दिसले. त्यानंतर, तिच्या घरात हे पथक दाखल झाले. त्यावेळी ती सामानाची आवराआवर करून ओरिसाला पळून जाण्याच्या बेतात असल्याचे उघड झाले.महिला पोलिसांच्या मदतीने मिन्नती गौडा हिची कसून चौकशी केली असता, तिने चोरीची कबुली दिली. त्यानंतर, एका बॅगेतून हिरेजडीत दागिने आणि सर्व सहा लाख ८५ हजारांचा ऐवजही पोलिसांना तिने काढून दिला. तिला या प्रकरणात ७ जून रोजी अटक केली. ठाणे न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.

अशी केली चोरी

भावेश मिर्गनानी यांच्याकडे घरकाम करणारी मिन्नती हिने त्यांच्या घराच्या कुलुपाची चावी काही दिवसांपूर्वीच मिळवली होती. १ ते ३ जून या काळात ते पत्नीसह गावी गेले होते. तर, सासरे रुग्णालयात दाखल असल्यामुळे घरी असलेली त्यांची सासू २ जून रोजी सकाळी १० ते १०.४० वा.च्या दरम्यान रुग्णालयात गेली. याच अवघ्या ४० मिनिटांच्या काळात तिने आधीच मिळवलेल्या चावीच्या आधारे त्यांच्या घरात डल्ला मारला. २ जून रोजी ती सीसीटीव्हीमध्ये दिसल्यामुळे संशय बळावला. चौकशीत तिनेच चोरी केल्याचे उघड झाल्याचे वपोनि अफजल पठाण यांनी सांगितले.

टॅग्स :RobberyदरोडाArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी