प्रेयसीने लग्नासाठी दबाव टाकल्यावर कायमचे संपवल; मृतदेहही पुरला, पण एका चुकीमुळे सत्य सत्य आले समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:35 IST2025-06-15T15:56:13+5:302025-06-15T16:35:58+5:30

कर्नाटकात प्रेयसीच्या हत्या करणाऱ्या प्रियकराला सहा महिन्यांनी अटक करण्यात आली.

Accused who killed his girlfriend in Karnataka was arrested after six months | प्रेयसीने लग्नासाठी दबाव टाकल्यावर कायमचे संपवल; मृतदेहही पुरला, पण एका चुकीमुळे सत्य सत्य आले समोर!

प्रेयसीने लग्नासाठी दबाव टाकल्यावर कायमचे संपवल; मृतदेहही पुरला, पण एका चुकीमुळे सत्य सत्य आले समोर!

Karnataka Crime: कर्नाटकात प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला सहा महिन्यांनी अटक करण्यात आली. लग्नासाठी तगाला लावल्याबद्दल एका २६ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या केली होती. आरोपी आपला गुन्हा लपवण्यासाठी तिचा मृतदेह ओढ्याजवळ पुरला होता, अशी माहिती कर्नाटकपोलिसांनी दिली.  २८ वर्षीय सतीश हिरेमठ असे या आरोपीचे नाव असून तो गडग जिल्ह्यातील नारायणपुरा गावातील आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याच गावातील मधुश्री अंगडी हिची सतीश हिरेमठने हत्या केली होती. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुश्रीचे सतीशसोबत जवळजवळ सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जेव्हा तिच्या कुटुंबाला दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तिला गडग येथील नातेवाईकांकडे राहण्यासाठी पाठवले. १६ डिसेंबर २०२४ च्या रात्री मधुश्री तिच्या नातेवाईकांच्या घरातून निघून गेली आणि परतलीच नाही. जवळजवळ एक महिन्यानंतर, १२ जानेवारी रोजी बेतागेरी पोलीस ठाण्यामध्ये ती बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांच्या तपासात ज्या रात्री मधुश्री गायब झाली होती त्यावेळी सतीश तिला नारायणपुरा जवळील एका फार्महाऊसवर घेऊन गेला होता. या भेटीदरम्यान मधुश्रीच्या लग्नाच्या आग्रहावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात सतीशने तिचा बुरख्याने गळा दाबून खून केला आणि नंतर तिचा मृतदेह ओढ्याजवळ पुरला. त्यानंतरच्या काही महिन्यांत सतीश काही घडलं नाही असं वागू लागला आणि पेट्रोल पंपावर काम करु लागला. मी शेवटचे मधुश्रीला शहराच्या बाहेरील भागात सोडले होते, असं तो पोलिसांना सांगत होता. मात्र मधुश्रीच्या मोबाईल फोनमधील लोकेशन डेटामुळे पोलिसांचा सतीशवरील संशय बळावला.

मधुश्रीच्या फोनचे लोकोशन हे सतीशने सांगितलेल्या ठिकाणापेक्षा वेगळे होते. मी सोडल्यानंतर ती कुठे गेली हे मला माहित नाही असं सतिश सांगत होता. मात्र तांत्रिक पुरावे वेगळेच काहीतरी सांगत होते. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता सतीशने आपला गु्न्हा कबुल केला. सतीशने पोलिसांना ज्या ठिकाणी मधुश्रीला ज्या ठिकाणी पुरले तिथे नेले. पोलिसांना त्या ठिकाणाहून सांगाड्याचे अवशेष सापडले, परंतु मधुश्रीची कवटी अद्याप गायब आहे. सतीशने मृतदेह अशा प्रकारे पुरला होता की त्याला वाटले की तो कधीच सापडणार नाही, असं पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Accused who killed his girlfriend in Karnataka was arrested after six months