छेडछाडीच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 11:27 PM2020-05-30T23:27:19+5:302020-05-30T23:29:21+5:30

विनयभंगाच्या आरोपाखाली तो हिसारच्या मध्यवर्ती कारागृहात होता. त्याला कोर्टात हजर करण्यात आले.

Accused in molestation found Corona positive and ... | छेडछाडीच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह अन्...

छेडछाडीच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह अन्...

Next
ठळक मुद्देहरियाणामध्ये हिसारमध्ये कोरोना विषाणूची 8 नवीन रुग्ण सापडले आहेतखटल्याची सुनावणी करणाऱ्या महिला न्यायाधीशांसह कोर्टाच्या 11 कर्मचाऱ्यांना अलग ठेवण्यात आले आहे.

हरियाणामध्ये हिसारमध्ये छेडछाड  केल्याप्रकरणातील आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे, त्यानंतर या खटल्याची सुनावणी करणाऱ्या महिला न्यायाधीशांसह कोर्टाच्या 11 कर्मचाऱ्यांना अलग ठेवण्यात आले आहे. विनयभंग केल्याचा आरोपी युवक हा फतेहाबाद जिल्ह्यातील टोहाना परिसरातील आहे. विनयभंगाच्या आरोपाखाली तो हिसारच्या मध्यवर्ती कारागृहात होता. त्याला कोर्टात हजर करण्यात आले.

हरियाणामध्ये हिसारमध्ये कोरोना विषाणूची 8 नवीन रुग्ण सापडले आहेत, कोरोना विषाणू भारतासह संपूर्ण जगात झपाट्याने पसरत आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक लाख 73 हजार 762 पार केली आहे, त्यापैकी 4 हजार 970 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त, 82 हजार 370 लोक उपचार घेतलेले आहेत, ज्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या बाबतीत भारत जगातील 9 व्या स्थानावर पोहोचला आहे.


त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या ७३ लाख ७६२ हजार पेक्षा जास्त झाली आहे, या प्राणघातक विषाणूंमुळे अमेरिका सर्वाधिक असुरक्षित आहे, जिथे कोरोनामुळे 17 लाख 47 हजार 85 हून अधिक लोक बाधित झाले आहेत. अमेरिकेत या प्राणघातक विषाणूमुळे एक लाख 2 हजार 835 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल; महिला पोलीस अधिकाऱ्याचा केला होता अपमान

 

धक्कादायक... मुलीच्या वाढदिवशीच बापानं मुलाला ठार मारलं, पोलिसांना कारण सांगितलं!

Web Title: Accused in molestation found Corona positive and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.