कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:02 IST2025-10-20T12:02:12+5:302025-10-20T12:02:51+5:30
एका तरुणाची हत्या करण्यात आली. त्यानंतर गाझियाबादच्या एलआयसीची फसवणूक करून तब्बल ७२ लाखांचा विमा क्लेम केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कारनामा! १६ वर्षांनी जिवंत सापडला मृत मुलगा; वडिलांनी हडपले ७२ लाख, अखेर फुटलं बिंग
आग्रा येथे एका तरुणाची हत्या करण्यात आली. त्यानंतर गाझियाबादच्या एलआयसीची फसवणूक करून तब्बल ७२ लाखांचा विमा क्लेम केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर विमा कंपनीने सिहानी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल केलेल्या खटल्यात, भारतीय जीवन विमा महामंडळाच्या मॉडेल टाउन शाखेचे मुख्य व्यवस्थापक यांनी सांगितलं की, गौतम बुद्ध नगर येथील भट्टा परसौल येथील रहिवासी अनिल सिंह यांनी २००३ ते २००६ दरम्यान चार विमा पॉलिसी काढल्या.
२००६ मध्ये विजयपाल सिंह यांनी विमा कंपनीला सांगितलं की, त्यांचा मुलगा अनिल याचा आग्रा येथील एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. त्यानंतर, विमा कंपनीने विजयपाल सिंह यांना अंदाजे ७२ लाख रुपये दिले. २०२३ मध्ये अहमदाबाद पोलिसांनी अनिल सिंह यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आणि त्याच्या हत्येची खोटी गोष्ट समोर आली.
गेल्या वर्षी अहमदाबाद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आग्रा येथील रकाबगंज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात असं दिसून आलं की, अनिल सिंहचा मृत्यू झालाच नव्हता. ३० जुलै २००६ रोजी विजयपाल सिंह, त्याचा मुलगा अभय सिंह आणि इतर साथीदारांनी एका मानसिकदृष्ट्या आजारी तरुणाचं अपहरण केलं,.
तरुणाला अनिल सिंहचे कपडे घातले आणि नंतर त्याची गाडी पेटवून देत तरुणाची हत्या केली. विम्याचे पैसे हडप करण्यासाठी हा संपूर्ण भयंकर कट रचण्यात आला होता. तब्बल १६ वर्षांनी हे सत्य समोर येत पर्दाफाश झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे.