शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

बिट कॉइन रकमेच्या हेराफेरीतून माधव पवारची हत्या, आरोपींनी दिली कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 11:40 AM

Murder Case :  मालेगावजवळ एका शेतात बंदुकीच्या गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी १६ सप्टेंबरला दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : नागपूर येथे ईथर ट्रेड एशिया या कंपनीअंतर्गत बिट कॉइनच्या व्यवसायात करोडो रुपयांची उलाढाल होत असे. या कंपनीत मयत माधव यशवंत पवार याच्याकडे व्यवहाराचा संपूर्ण हिशेब असल्याने त्याने बिट कॉइनच्या रकमेची हेराफेरी केली. त्यामुळेच त्याचे नागपूर येथून अपहरण करण्यात आले. त्यानंतर मालेगावजवळ एका शेतात बंदुकीच्या गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी १६ सप्टेंबरला दिली.

माधव यशवंत पवार (रा. नागपूर) याचा १२ सप्टेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे शेत शिवारात नग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. पवार याची गोळी झाडून हत्या केल्यामुळे पोलीस यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली. घटनेचा मोठ्या शिताफीने तपास करण्यात आला. मयत इसम हा नागपूर येथील रहिवासी असल्याबाबत माहिती मिळताच मयताची ओळख पटवून खात्री करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक नागपूरला गेले होते. या पथकाने गोपनीय माहिती काढून मयत माधव यशवंत पवार असल्याची खात्री केली.

नजीकच्या काळात त्याच्या संपर्कात असलेले शुभम भीमराव कान्हारकर, विकल्प उर्फ विक्की विनोराव मोहोड, व्यंकेश उर्फ टोनी बिसन भगत यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिघांनाही पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, आणखी तीन साथीदारांच्या मदतीने माधव यशवंत पवार याची गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली.

सदर कारवाईत पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांचे मार्गदर्शनात, अपर पोलीस अधीक्षक विजय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, प्रमोद इंगळे, अजयकुमार वाढवे, विजय जाधव, नागपूर पोलीस उपायुक्त राजमाने व पथकातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने खुनाचे रहस्य अवघ्या पाच दिवसांत उघडकीस आले. याप्रती पोलिसांचे सर्वच स्तरांतून कौतूक होत आहे.

 

  पवार सेमिनार आयोजित करायचा

या घटनेतील मुख्य आरोपी निशिद वासनिक यांच्या मालकीच्या ईथर ट्रेड एशिया कंपनीत बिट कॉइनच्या व्यवसायात लोकांनी गुंतवणूक करावी, यासाठी मृतक माधव हा सेमिनार आयोजित करायचा. व्यवसायाचा हिशेबही तोच ठेवत असे. या व्यवसायात मृतक पवार याने बिट कॉइनच्या पैशाची हेराफेरी केल्याच्या कारणावरून आरोपींनी माधवचे त्याच्या घरून अपहरण केले. त्यानंतर त्याची वाशिम जिल्ह्यातील एका शेतात गोळी झाडून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी शुभम कान्हारकर (२२ ), विकल्प उर्फ विक्की विनोदराव मोहोड (२५), व्यंकेश उर्फ टोनी बिसन भगत (२५) (सर्व रा. आराधनानगर, खरबी, नागपूर) यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिमnagpurनागपूर