शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

बनावट ई-पास बनविणारा आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 22:39 IST

उच्चशिक्षित आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

नागपूर : बाहेरगावी जाण्यासाठी लागणारी पोलिसांची बनावट परमिशन पास (ई पास) तयार करून विकणाऱ्या एका उच्चशिक्षित आरोपीला पोलिसांनीअटक केली. 

अंकुश गणेशराव मेतकर (वय २७) असे आरोपीचे नाव असून तो जुना सुभेदार नगरातील कोकरे ले आउटमध्ये राहतो. जुना सुभेदार ले आउट मध्ये राहणारे सागर सावळे हे पॅथॉलॉजी चालवितात. त्यांच्याकडे बुलढाणा येथील एका डॉक्टर कडून नियमित नमुने तपासणीसाठी येतात. तपासलेल्या नमुण्यांचा अहवाल बुलढाणा येथे पोहोचण्यासाठी साबळे यांना ई पासची आवश्यकता होती. 

१८ मे रोजी मानेवाडातील शाहू गार्डन स्कूल जवळ आरोपीच्या जीएम टेक्निकल सर्विसेस नेट कॅफेवर त्यांना ऑनलाइन पास तयार करून मिळेल, असा फलक दिसला. त्यामुळे सावळे यांनी आरोपी अंकुश मेतकर यांच्याकडून १०० रुपयात ही पास बनवून घेतली आणि ते १९ मे रोजी त्यांच्या जयंत गोगटे नामक मित्रासह बुलढाणा येथे जायला निघाले. वाशिम जवळच्या अनसिंगी फाटा येथे पोलिसांनी त्यांची गाडी थांबवून त्यांच्या पासची तपासणी केली असता ही पास बनावट असल्याचे उघड झाले. त्या पासवर असलेला बारकोड हा चंद्रपूरच्या वैभव मेश्राम यांचा होता. तो नागपूर ते चंद्रपूर या प्रवासासाठी मंजूर करण्यात आल्याचेही पुढे पोलिसांच्या लक्षात आले। त्यामुळे वाशीम पोलिसांनी ही माहिती नागपूर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत, नायक श्रीकांत अनुप, शिपाई संतोष यांनी चौकशी करून बुधवारी आरोपी अंकुश मेतकर याला ताब्यात घेतले.  उच्चशिक्षित असलेल्या अंकुशला संगणकाचे चांगले ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा गैरवापर करत तो बनावट ई पास बनवीत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. पोलिसांकडून आवाहन अशा प्रकारच्या बनावट पास कुणाकडूनही घेऊ नये. रीतसर शासनाच्या संकेत स्थळावर जाऊन परवानगी घ्यावी आणि अधिकृत पास घेऊनच कुठलाही प्रवास करावा, असे आवाहन पोलीस विभागाने यानिमित्ताने केले आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसnagpurनागपूर