The accused arrested in dowry death case at bhosari | भोसरीत हुंडाबळी; आरोपीस अटक
भोसरीत हुंडाबळी; आरोपीस अटक

पिंपरी : माहेरून २० हजारांचा हुंडा आणण्याची मागणी विवाहितेकडे करण्यात आली. यात छळ झाल्याने विवाहितेचा मृत्यू झाला. भोसरीतील गवळी माथा येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण रमेश यादव (वय २१) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. रमेश चंद्रबली यादव (वय २७, रा. गवळीमाथा, एमआयडीसी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शत्रुघ्न सीतलाप्रसाद यादव (वय ५५, रा. पचारी खुर्द, पो. बितेहरा, ता. उदवली, जि. बस्ती, उत्तर प्रदेश)  यांनी फिर्याद दिली आहे. 
किरण यांनी त्यांच्या माहेरून हुंडा म्हणून २० हजार रुपये आणावेत, असे सांगून आरोपी रमेश यादव याने वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली. किरण यांचा शारीरिक व मानसिक छळ करून हुंड्यासाठी छळवणूक केली. २०१७ ते शुक्रवार, दि. १२ जुलै २०१९ दरम्यान छळ सुरू होता. किरण यांचा या छळवणुकीमुळे मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


 


Web Title: The accused arrested in dowry death case at bhosari
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.