शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' आएएएस अधिकाऱ्यासह दहा जणांच्या घरांवर एसीबीचे छापे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 05:21 IST

टीएमटी घोटाळा प्रकरणी तत्कालीन परिवहन व्यवस्थापक करंजकर यांच्या ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील गिरिजा नीळकंठ हाइटस्‌ येथील २११ क्रमांकाच्या सदनिकेत २ मार्च रोजी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांच्या आधिपत्याखालील ११ पथकांनी ही शोधमोहीम राबविली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ४७० प्रवासी बसथांब्यांच्या जागी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर प्रवासी निवारे बांधून त्यावर जाहिरात प्रदर्शित करण्याच्या ठेक्यांमध्ये केलेल्या सहा कोटी ७३ लाखांच्या घोटाळ्यामध्ये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर मंगळवारी त्यातील सनदी अधिकारी अशोक करंजकर यांच्यासह दहा जणांच्या घरात झडती घेतली. तत्कालीन परिवहन व्यवस्थापक करंजकर यांच्या ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील गिरिजा नीळकंठ हाइटस्‌ येथील २११ क्रमांकाच्या सदनिकेत २ मार्च रोजी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांच्या आधिपत्याखालील ११ पथकांनी ही शोधमोहीम राबविली. करंजकर यांच्याशिवाय तत्कालीन परिवहन व्यवस्थापक श्रीकांत सरमोकदम यांच्या खोपट येथील निवासस्थानी, तत्कालीन परिवहन उपव्यवस्थापक कमलाकर दीक्षित यांच्या लुईसवाडीतील मैत्री टॉवरमध्ये, मुख्य लेखापाल (सेवानिवृत्त) अजित निऱ्हाळे यांच्या पाचपाखाडीतील श्रीजी व्हिला, तसेच बडतर्फ अधिकारी गुरुनाथ पेडणेकर यांच्या नवी मुंबईतील नेरूळ येथील घरातही ही छापेमारी झाली. याशिवाय, तत्कालीन वाहतूक निरीक्षक दिलीप कानडे, तसेच पिटर पिंटो आणि सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत धुमाळ आदी आठ अधिकाऱ्यांच्या घरी ही छापेमारी झाली. 

n२००८ ते २०१८ या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणे परिवहन सेवेतील तत्कालीन व्यवस्थापक करंजकर यांच्यासह आठ अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा आणि पदाचा दुरुपयोग करून जाहिरात प्रदर्शनाचे हक्क देण्याबाबतचा ठेका मिळण्यासाठी टीएमटीकडून घेतलेल्या निविदा प्रक्रियेत कोरोडोंचा घोटाळा केल्याप्रकरणी एसीबीने श्रीनगर पोलीस ठाण्यात १ मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका