तलाठी व लिपिकाला लाच स्वीकारताना एसीबीने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 20:21 IST2019-02-11T20:19:43+5:302019-02-11T20:21:06+5:30

तलाठी शंकर साळवी (38) आणि लिपिक नितीन पाटील (35) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली.

ACB has arrested the Talathi and the scribe for accepting a bribe | तलाठी व लिपिकाला लाच स्वीकारताना एसीबीने केली अटक

तलाठी व लिपिकाला लाच स्वीकारताना एसीबीने केली अटक

ठळक मुद्देतक्रारदार यांनी त्यांच्या रुंदे तालुका कल्याण येथील जमिनीचे फेरफारचे कागदपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. तक्रारदारकडून साळवी याच्यावतीने तीन हजारांची लाच स्वीकारताना पाटील याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. 

कल्याण - तक्रारदाराकडून तीन हजाराची लाच स्वीकारताना तलाठी शंकर साळवी (38) आणि लिपिक नितीन पाटील (35) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली.
तक्रारदार यांनी त्यांच्या रुंदे तालुका कल्याण येथील जमिनीचे फेरफारचे कागदपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदर कागदपत्रे तक्रारदार यांना पुरविण्यासाठी साळवीने तीन हजाराची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार विभागाने सोमवारी दुपारी तहसील कार्यालयात सापळा रचला होता. यावेळी, तक्रारदारकडून साळवी याच्यावतीने तीन हजारांची लाच स्वीकारताना पाटील याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. 

Web Title: ACB has arrested the Talathi and the scribe for accepting a bribe