एसीबीने दाखल केला एसआरएच्या ३ अभियंत्यासह खाजगी इसमांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 20:05 IST2019-05-30T20:03:27+5:302019-05-30T20:05:03+5:30
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एसीबीने दाखल केला एसआरएच्या ३ अभियंत्यासह खाजगी इसमांविरोधात गुन्हा
मुंबई - तक्रारदार यांच्याकडे इंटिरियर डिझाईन आणि नूतनीकरण कामासंदर्भात परवानगी देण्यासाठी वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण प्रशासकीय इमारतीतील के - पूर्व विभागातील कार्यकारी अभियंता प्रल्हाद महिषी, दुय्यम अभियंता धनंजय सूर्यवंशी, उपअभियंता चंद्रशेखर दिघावकर आणि खाजगी इसम हरीश पाटकर यांनी एकत्र मिळून ६ लाख लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराकडे त्याची इच्छा नसताना या कार्यकारी अभियंता प्रल्हाद महिषी, दुय्यम अभियंता धनंजय सूर्यवंशी, उपअभियंता चंद्रशेखर दिघावकर यांनी प्रत्येकास २ लाख या हिशोबाने ६ लाख रुपये लाच मागितली. तडजोडीअंती ही रक्कम साडेचार इतकी ठरली. याबाबत तक्रारदाराने एसीबीला तक्रार दाखल केली. नंतर याप्रकरणी पाटकर याने सहाय्य केले म्हणून त्याच्यासह इतर तिघांविरोधात एसीबीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.