शिवडी कोर्टात लाचखोर क्लार्कला एसीबीने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 21:28 IST2019-12-16T21:26:20+5:302019-12-16T21:28:00+5:30

फिर्यादीकडे जयेशने २ हजार रुपये लाच मागितली.

 ACB arrested for bribery Clark in Sewree court | शिवडी कोर्टात लाचखोर क्लार्कला एसीबीने केली अटक

शिवडी कोर्टात लाचखोर क्लार्कला एसीबीने केली अटक

ठळक मुद्देया लाचखोर क्लार्कचे नाव जयेश विनायक अडांगळे (३३) असं आहे.लेखी तक्रारीवरून आज एसीबीने सापळा रचून जयेशला २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. 

मुंबई - शिवडी कोर्टाच्या ५६ व्या न्यायालयात निकालाची साक्षांकित प्रत देण्यासाठी क्लार्कने तक्रादाराकडे २ हजार रुपयांची मागणी केली. ही लाच स्वीकारताना क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ अटक केली. या लाचखोर क्लार्कचे नाव जयेश विनायक अडांगळे (३३) असं आहे.

तक्रारदार यांचा शिवडी महानगर दंडाधिकारी ५६ वे न्यायालयात एनआय कायदा कलम १३८ अन्वये खटला सुरु होता. या खटल्याची सुनावणी होऊन त्याच्या निकालाची साक्षांकित प्रत देण्यासाठी आरोपी जयेशकडे मागणी केली असता फिर्यादीकडे जयेशने २ हजार रुपये लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने एसीबीकडे तक्रार केली. लेखी तक्रारीवरून आज एसीबीने सापळा रचून जयेशला २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. 

Web Title:  ACB arrested for bribery Clark in Sewree court