खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 18:04 IST2021-09-29T18:03:44+5:302021-09-29T18:04:33+5:30
Rape Case : मुलगी गर्भवती राहून दोन दिवसांपूर्वीच तिची प्रसूती देखील झाली असल्याने या प्रकरणी मुलीच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .

खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म
भिवंडी - मुंबई व डोंबिवली येथील अत्याचाराच्या घटना समोर असतानाच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालायची खळबळजनक घटना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी तालुका पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे . विशेष म्हणजे आरोपी व पीडित तरुणी हे जवळच्या नात्यांमध्ये असून अत्याचारी नराधमाकडून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहून दोन दिवसांपूर्वीच तिची प्रसूती देखील झाली असल्याने या प्रकरणी मुलीच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .
पीडित अल्पवयीन तरुणी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी असून आरोपी तिच्या नात्यातील असल्याने तोही पीडितेच्या घरीच राहत होता. काही महिन्यापूर्वी पासून तो पीडितेवर वारंवार अत्याचार करीत होता. त्यातच आरोपीच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. मात्र बदनामीच्या भीतीने तीने कुठेही तक्रार दिली नसल्याचे समोर आले असून पीडित अल्पवयीन तरुणीने २६ सप्टेंबर रोजी भिवंडीतील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात एका अपत्यास जन्म दिला. त्यांनतर या प्रकाणातील गांभीर्य ओळखून पीडितेच्या आईने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून तालुका पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ सह पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत . त्यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता १ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .