सामूहिक बलात्काराने गरोदर महिलेचा गर्भपात; उत्तर प्रदेशमधील घटनेनं परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 15:39 IST2022-09-23T15:38:57+5:302022-09-23T15:39:03+5:30

पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोप या महिलेने केला.

Abortion of a pregnant woman by gang-rape; The incident in Uttar Pradesh | सामूहिक बलात्काराने गरोदर महिलेचा गर्भपात; उत्तर प्रदेशमधील घटनेनं परिसरात खळबळ

सामूहिक बलात्काराने गरोदर महिलेचा गर्भपात; उत्तर प्रदेशमधील घटनेनं परिसरात खळबळ

बरेली: उत्तर प्रदेशातील बरेली येथे गरोदर महिलेवर सामूहिक बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. बलात्कारामुळे महिलेचा गर्भपात झाला. पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. 

तथापि, कारवाई होत नसल्याने पीडितेच्या सासूने डब्यात भ्रूण घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि न्याय देण्याची मागणी केली. ही घटना १३ सप्टेंबर रोजी बिशारतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोप या महिलेने केला.

सून कामासाठी शेतात गेली होती. शेतातून परतत असताना गावातील नन्हे, आधार आणि अजय या तिघांनी तिला पकडले. तिने आरडाओरड केली. तेव्हा आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सर्वांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे सून बेशुद्ध झाली. तिला तसेच सोडून आरोपी पळून गेले. बराच वेळ होऊनही सून घरी आली नाही. त्यामुळे आम्ही तिला शोधत शेतात गेलो. तेथे सून बेशुद्धावस्थेत आढळून आली. आम्ही तिला रुग्णालयात नेले. ती तीन महिन्यांची गरोदर होती. बलात्कारामुळे तिचा गर्भपात झाला. सून सध्या जिल्हा रुग्णालयात आहे, असे या महिलेने सांगितले. 

दोन गटांत वाद-

दोन्ही गटांत यापूर्वीही वाद होऊन मारहाणीचा प्रकार घडला आहे. तथापि, महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली असून, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Abortion of a pregnant woman by gang-rape; The incident in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.