प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 02:33 IST2018-11-06T02:33:34+5:302018-11-06T02:33:46+5:30

कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे मोरवाडी, पिंपरी येथून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपहरण करण्यात आले. या प्रकरणी पती रवि वसंत वावरे यांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

Abduction of a married woman | प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे अपहरण

प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे अपहरण

पिंपरी - कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे मोरवाडी, पिंपरी येथून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपहरण करण्यात आले. या प्रकरणी पती रवि वसंत वावरे यांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पाचपैकी एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा भाऊ महेश विष्णू लवटे (वय २२, रा. पनवेल, जि. रायगड) याने त्याच्या तीन-चार साथीदारांच्या मदतीने जबरदस्तीने विवाहितेला मोटारीत बसवून पळवून नेले. मोरवाडी, मोरजाई मंदिराजवळील सुखवानी एम्पेरिअर या सोसायटीत राहणाऱ्या रवि वसंत वावरे यांनी पत्नीचे अपहरण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. विवाहितेचे अपहरण करणारा आरोपी लवटे हा मूळचा कडलस, ता. सांगोला, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणीने मोरवाडी, पिंपरी येथे राहणाºया वावरे यांच्याबरोबर प्रेमविवाह केला. हा राग मनात धरून आरोपी साथीदारांना घेऊन रविवारी पिंपरी येथे आला. एमएच ११ बीडी ५७९३ या मोटारीतून आरोपीनी विवाहितेचे अपहरण केले.

Web Title: Abduction of a married woman