सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला आरे पोलिसांनी केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 18:49 IST2018-11-06T18:48:44+5:302018-11-06T18:49:25+5:30

शिवा शेट्टीविरोधात महाराष्ट्र, दमण आणि गुजरातमध्ये जवळपास ३० चोरीचे गुन्हे आहे.

aarey police arrested wanted robber in ransom cases | सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला आरे पोलिसांनी केले जेरबंद

सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला आरे पोलिसांनी केले जेरबंद

मुंबई - आरे पोलिसांनी खंडणी प्रकरणी सराईत गुन्हेगार शिवा शेट्टीला अखेर बेड्या ठोकल्या आहे. शिवा शेट्टीविरोधात महाराष्ट्र, दमण आणि गुजरातमध्ये जवळपास ३० चोरीचे गुन्हे आहे.

गोरेगाव येथील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फिल्म सिटीमध्ये मोठंमोठे सेट उभारण्यासाठी लागणाऱ्या कामगारांचे कंत्राट आपल्याला मिळविण्यासाठी धमकाविणे आणि खंडणीची मागणी करणे आणि चोरीचे अनेक गुन्हे असलेल्या शिवा शेट्टीविरोधात आरे पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र, अनेक दिवस उलटले तरी कारवाई होत नसल्याने तक्रारदार पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांना भेटले होते. त्यानंतर आज शिवा या सराईत चोराला आणि गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.  आज आरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बेल्हे यांनी ही कारवाई करत शिवाला बेड्या ठोकल्या आहेत. 

Web Title: aarey police arrested wanted robber in ransom cases