पारगाव मेमाणे येथे दारूच्या पैश्याच्या कारणावरून तरुणाचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2023 10:32 IST2023-12-03T10:31:40+5:302023-12-03T10:32:00+5:30

जेजुरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

A young man was killed due to alcohol money in Pargaon Memane | पारगाव मेमाणे येथे दारूच्या पैश्याच्या कारणावरून तरुणाचा खून 

पारगाव मेमाणे येथे दारूच्या पैश्याच्या कारणावरून तरुणाचा खून 

जेजुरी- पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथे दारू पिण्याच्या पैश्याच्या कारणावरून अक्षय संजय कुंभारकर वय २५ या तरुणाचा मारहाण करून तलावाच्या पाण्यात फेकून देवून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. जेजुरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव सुनील शशिकांत सावंत रा.सावंत वस्ती पारगाव मेमाणे, ता पुरंदर तर खून झालेल्या तरुणाचे नाव अक्षय संजय कुंभारकर वय .२५ रा वनपुरी ता पुरंदर जि पुणे असे आहे.     

या प्रकरणाबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि ३० रोजी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव मेमाणे येथे दुपारी साडे तीन ते चार च्या दरम्यान आरोपी सुनील सावंत याने अक्षय कुंभारकर यास दारू पिण्याच्या पैश्याच्या कारणावरून शिवागाळ व हातापायाने मारहाण करून पाण्याच्या तलावात फेकून दिले. या तरुणास गंभीर अवस्थेत दवाखान्यात दाखल झाले .उपचारा दरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला . या बाबत अक्षय कुंभारकर याचे भाऊ अजय संजय कुंभारकर यांनी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती. आरोपी सुनील सावंत या जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे .या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे हे तपास करीत आहेत.

Web Title: A young man was killed due to alcohol money in Pargaon Memane