रेल्वेत नाेकरीचे आमिष दाखवून तरुणाला गंडा; गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Updated: July 15, 2023 21:10 IST2023-07-15T21:09:55+5:302023-07-15T21:10:24+5:30

याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A young man was cheated by showing the lure of a job in the railway; Filed a case | रेल्वेत नाेकरीचे आमिष दाखवून तरुणाला गंडा; गुन्हा दाखल

प्रतिकात्मक फोटो

लातूर : रेल्वे खात्यात एसी काेच असिस्टंट मॅनेजर या पदावर नाेकरी लावताे, असे आमिष दाखवत एका तरुणाला गंडविल्याची घटना लातुरात ३० जून राेजी घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, साहिल ताहेर पठाण (वय २२, रा. उस्मानपुरा, लातूर) याला लातूर येथील गरुड चाैक परिसरात राहणाऱ्या अलिम शरिफ शहा (वय २५) याने रेल्वे खात्यात एसी काेच असिस्टंट मॅनेजर या पदावर नाेकरी लावताे म्हणून कागदपत्र, राेख २५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. शिवाय, तुला खाेट्या गुन्ह्यात जेलमध्ये टाकताे, अशी धमकी दिली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपाेनि. पठाण करीत आहेत.

Web Title: A young man was cheated by showing the lure of a job in the railway; Filed a case