लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलेचे डोके भिंतीवर आपटून केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 17:23 IST2022-03-16T17:08:02+5:302022-03-17T17:23:08+5:30
Murder Case : चिंचपाडा येथील घटना, गुन्हा दाखल

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलेचे डोके भिंतीवर आपटून केले ठार
सदानंद नाईक
उल्हासनगर : यापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या अनिल भातसोडे याने मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान महिलेचे डोके भिंतीवर मारून जीवेठार मारल्याची घटना चिंचपाडा येथे घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथे सुकन्या आव्हाड ही महिला आपल्या १७ वर्षाच्या मुलीसोबत राहत होती. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान मुलगी घरा बाहेर उभ्या केलेल्या रिक्षात मोबाईल बघत होती. तेंव्हा मुलीला आईचा ओरडण्याचा व भांडे पडल्याचा आवाज आला. तेव्हा तिने खिडकीतून बघितले असता ओळखीचा अनिल भातसोडे हा आई सुकन्या हिला लाथाबुक्कीने मारत होता. त्यांनी महिलेचे डोके भिंतीला मारल्याने महिलेचा मुत्यु झाला. यावेळी भातसोडे घरातून पळून जात असताना मुलीने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जाण्याचा यशस्वी झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला व भातसोडे हे काही वर्षांपासून लिव्ह अँड रिलेशन मध्ये राहत होते. मात्र काही कारणास्तव ते गेल्या तीन महिन्यापासून वेगळे राहत असलेतरी महिलेला तो बोलावून नेत होता.
मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान अनिल भातसोडे हा महिलेच्या घरी आल्यावर, दोघात काही कारणास्तव भांडण झाले. हेच भांडण महिलेच्या जीवावर उठल्याचे बोलले जात आहे. महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून पोलीस फरार झालेला आरोपी अनिल भातसोडे यांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.