विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गमित्रासोबत अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले; चर्चगेट येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 19:03 IST2022-12-24T18:56:14+5:302022-12-24T19:03:40+5:30

विद्यार्थ्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

A student was forced to perform an indecent act with his own classmate; Incident in Churchgate | विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गमित्रासोबत अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले; चर्चगेट येथील प्रकार

विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गमित्रासोबत अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले; चर्चगेट येथील प्रकार

मुंबई: सांताक्रुझ येथील विद्यार्थ्यांना मारहाणीची घटना ताजी असतानाच, चर्चगेट परिसरातील नामांकित अकादमीतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना एकमेकांसोबत अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले, तसेच बघून घेण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिपाई धीरज सोळंकी (३९) विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आझाद मैदान पोलिस अधिक तपास करत आहेत.

विद्यार्थ्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तक्रारदार या ग्रँट रोड परिसरात राहण्यास आहेत. त्यांचा सहा वर्षांचा मुलगा येथील अकादमीमध्ये पहिली इयत्तेत शिक्षण घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलगा घाबरलेला वाटत असल्याने, आईने त्याला विश्वासात घेत चौकशी केली, तेव्हा सोळंकीच्या विकृतीला वाचा फुटली. 

सोळंकीने १५ तारखेला दुपारी २ ते ३ च्या सुमारास त्यांच्या मुलाला वर्गमित्रांसोबत अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. तसे नाही केल्यास बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकाराने मुलगा घाबरला. अखेर त्याच्या आईने याबाबत शाळेत तक्रार केली. त्या पाठोपाठ गुरुवारी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

चौकशी सुरु 

या प्रकरणी अधिक चौकशी सुरु असून, अद्याप कुणाला अटक केली नसल्याचे आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भूषण महादेव बेळणेकर यांनी सांगितले.

Web Title: A student was forced to perform an indecent act with his own classmate; Incident in Churchgate