पीएसआय भर बाजारात गर्लफ्रेंडसोबत रोमँटीक होत होता, बायकोने पाहताच 'बाजार'च उठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 15:23 IST2022-12-31T15:22:10+5:302022-12-31T15:23:11+5:30

पोलीस अधिकारी बस्तीमध्ये पत्नीसोबत राहत होता. तसेच गर्लफ्रेंडलाही त्याने बस्तीमध्येच आणून ठेवले होते.

A police sub-inspector was having a romantic love affair with his girlfriend from six years, wife saw it in Uttar Pradesh | पीएसआय भर बाजारात गर्लफ्रेंडसोबत रोमँटीक होत होता, बायकोने पाहताच 'बाजार'च उठला

पीएसआय भर बाजारात गर्लफ्रेंडसोबत रोमँटीक होत होता, बायकोने पाहताच 'बाजार'च उठला

गर्लफ्रेंडसोबत भर बाजारात इश्काचा ज्वर चढलेल्या पोलीस सब-इन्स्पेक्टरचे पुरते धाबे दणाणले आहेत. जेव्हा त्याच्या पत्नीने दुसरीसोबत रंगेहात पकडले तेव्हा दोघांच्यारही चेहऱ्यावरचे रंग उडाले होते. भर बाजारात जोरदार राडा झाला आणि बघ्यांची चांगलीच करमणूक झाली. पत्नीने पीएसआयची कॉलरच धरली. प्रकरण एवढे वाढले की वरात पोलीस ठाण्यापर्यंत गेली होती. 

मला पतीसोबत रहायचे नाहीय, त्याच्यावर एफआयआर दाखल करावा अशी मागणी पत्नीने पोलीस ठाण्यात केली. परंतू, पती पोलीस अधिकारी असल्याने पोलिसांनी या प्रकरणावर कोणतीही कारवाई केली नाही. 

ही घटना उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील आहे. रौता चौकात अचानक ड्रामा सुरु झाला. कोणाला काहीच कळत नव्हते. एक पोलीस इन्स्पेक्टर त्याच्या पत्नीकडून बोलणी ऐकून घेत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. बाजुला एक महिला देखील उभी होती, जी त्याच्यासोबत भर बाजारात प्रेमाचे रंग उधळत फिरत होती. पीएसआयचे नाव दीपक शर्मा आहे, तर त्याची नियुक्ती गोरखनाथ पोलीस ठाण्यात आहे. बस्तीमध्ये तो पत्नीसोबत राहत होता. तसेच गर्लफ्रेंडलाही त्याने बस्तीमध्येच आणून ठेवले होते. 

घरी आल्यानंतर तो दोघांनाही भेटत होता. पीडित पत्नीने सांगितले की, तिला एक मुलगी आहे. घरी आल्यानंतर पतीने काही वेळातच मुलीला फिरायला घेऊन जातो असे सांगितले. पण मला त्याचे कुठेतरी काहीतरी सुरु असल्याचा संशय आला होता. म्हणून मी त्याचा पाठलाग केला. एका चौकात गेल्यावर तो एका महिलेशी खूपच जवळकीने बोलत होता. मी त्या दोघांना थांबविताच त्याच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. त्याने तिथून पळण्याचा प्रयत्न केला. यामुळे आमच्यात धक्काबुक्की झाली, असे तिने पोलिसांना सांगितले. 

पतीचे गेल्या ६ वर्षांपासून दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध आहेत. पतीची पोस्टिंग गोरखपूरला आहे. पण बस्तीमध्ये आल्यावर तो माझ्याशी खोटं बोलायचा आणि त्याच्या मैत्रिणीला भेटायला जायचा, असे तिने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. 

 

Web Title: A police sub-inspector was having a romantic love affair with his girlfriend from six years, wife saw it in Uttar Pradesh