शहरं
Join us  
Trending Stories
1
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
2
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
3
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
4
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
5
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
6
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
7
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
8
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
9
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
10
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
11
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
12
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
13
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
14
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
15
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
16
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
18
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
19
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
20
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:17 IST

या महिलेला तीन मुलं असून, ती सुमारे १२ वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. या काळात तिचे दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत प्रेमसंबंध होते.

प्रेमसंबंधातून घडलेल्या एका गुन्ह्याने संपूर्ण बिहारमध्ये खळबळ उडवून दिली आहे. राजधानी पाटणाजवळ एका विवाहित महिलेने आपल्या दुसऱ्या प्रियकराची हत्या केली. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात तिने तिच्या पहिल्या प्रियकराची मदत घेतली.

या महिलेला तीन मुलं असून, ती सुमारे १२ वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. या काळात तिचे दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत प्रेमसंबंध होते. दुसऱ्या प्रियकराने ब्लॅकमेल केल्यानंतर ती तणावाखाली आली आणि त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

३ मुलांची आई आणि दोन अफेयर गुडिया नावाची ही महिला बेऊरमधील साईचक परिसरात राहत होती. तिचे लग्न पाटण्यात झाले होते आणि तिला तीन अपत्यं आहेत. पतीपासून वेगळी राहू लागल्यानंतर तिचे एका विजय नावाच्या पुरुषाशी प्रेमसंबंध जुळले. त्यांचे हे नाते तब्बल १४ वर्षे टिकले. या दरम्यान, विजयचा ड्रायव्हर सूरज कुमारशी तिची ओळख झाली आणि कालांतराने त्या दोघांतही जवळीक निर्माण झाली. पुढील ५ वर्षे गुडियाचे सूरजसोबत प्रेमसंबंध होते.

ब्लॅकमेलिंगमुळे हत्यागुडिया आणि सूरज यांचे नाते तणावपूर्ण बनत गेले. सूरजने तिचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते आणि तो तिला सतत धमकी देत होता. या ब्लॅकमेलिंगपासून सुटका मिळवण्यासाठी गुडियाने आपल्या पहिल्या प्रियकर विजयकडे मदत मागितली. विजयने त्याचा मित्र अश्वनी कुमारला यामध्ये सामील केलं आणि तिघांनी मिळून सूरजच्या हत्येचा कट रचला.

खुनाची योजना आणि अंमलबजावणीमे महिन्यात पाटण्याजवळील परसा बाजार परिसरात सूरजला बोलावण्यात आलं. तिथे विजय आणि अश्वनीने त्याला आधी दारू पाजली, त्यानंतर त्याचा गळा दाबून आणि धारदार शस्त्राने हत्या केली. मृतदेह नंतर परसा बाजारजवळील एतवारपूर परिसरातील एका शेतात फेकण्यात आला.

पोलीस तपास आणि अटकेची कारवाईहत्येनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि लवकरच गुडिया व तिच्या दोघा साथीदारांचा गुन्ह्यात सहभाग उघडकीस आला. पोलिसांनी गुडिया, विजय आणि अश्वनीला अटक केली असून, त्यांच्याकडून हत्येत वापरलेले शस्त्र, दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सध्या या तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू