धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर पोलिसाने केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 17:18 IST2022-11-03T17:14:24+5:302022-11-03T17:18:50+5:30
मडगाव पोलीस स्थानकात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवेत असलेल्या विजय गावणेकर यांने दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी सलगी केली.

धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर पोलिसाने केला बलात्कार
फोंडा - एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी फोंडा पोलिसांनी विजय रोहिदास गावणेकर (वय 29, राहणार उसगाव) याला अटक केली आहे. मडगाव पोलीस स्थानकात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवेत असलेल्या विजय गावणेकर यांने दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी सलगी केली. त्या मुलीशी मैत्री होताच अज्ञात स्थळी नेऊन काही दिवसांपूर्वी तिच्यावर बलात्कार केला.
बलात्काराचे घटना घडल्यानंतर सुरुवातीला घाबरून ती मुलगी गप्प राहिली. परंतु काल तिने यासंदर्भात आपल्या पालकांकडे वाच्यता केली. सदरची गंभीर बाब लक्षात येताच बुधवारी रात्री उशीरा विजय गावणेकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी रात्रीच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले व नंतर रीतसर अटक करण्यात आली आहे. आज त्याला रिमांड साठी उभे करण्यात आले आहे. उपअधीक्षक सी एल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुमार चोडणकर तपास करत आहेत.